पोलिसावर जडले मेव्हणीचे प्रेम अऩ्...

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

बहिणीचा नवरा (मेव्हणा) पोलिस दलामध्ये कार्यरत होता. मेव्हणीचे बहिणीच्या नवऱयासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. दोघांच्या प्रेमाबद्दल बहिणीला समजले. प्रेमाच्या त्रिकोणातून पोलिसाला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे.

जयपूर (राजस्थान): बहिणीचा नवरा (मेव्हणा) पोलिस दलामध्ये कार्यरत होता. मेव्हणीचे बहिणीच्या नवऱयासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. दोघांच्या प्रेमाबद्दल बहिणीला समजले. प्रेमाच्या त्रिकोणातून पोलिसाला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे.

गर्लफ्रेण्ड समजून महिला पोलिसाशी केले चॅटींग अऩ्...

राजस्थान पोलिसांनी चार महिन्यानंतर पोलिसाच्या मृत्यूचा तपास लावला आहे. पोलिसाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. बुदी शहरात पोलिस दलामध्ये असलेले अभिषेक शर्मा हे 28 ऑगस्ट 2019 रोजी कामासाठी बाहेर पडले होते. परंतु, त्या दिवशी रात्री अकरा नंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. घरच्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण, शोध लागत नव्हता. कुटुंबियांनी 5 सप्टेंबर रोजी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी शोध घेत होते.

पोलिस चौकीतील दोघांची मिठी पाहून फुटला अश्रूंचा बांध...

28 अगस्त को लापता हुआ था बूंदी पुलिस का कांस्टेबल

बुंदी शहराचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सतनाम सिंह म्हणाले, 'अभिषेक शर्मा बेपत्ता झाल्यानंतर वेगवेगळ्या मार्गांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान अभिषेक व त्यांची मेव्हणीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. मेव्हणी श्यामा शर्मा व तिचा प्रियकर नावेदला ताब्यात घेण्यात आले. यावेळी दोघांनी खून करून मृतदेह पुरल्याची माहिती दिली. दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.'

34 युवक अन् 9 युवतींचा नशेत धिंगाना...

दरम्यान, अभिषेक व श्यामाच्या प्रेमसंबंधाबद्दल बहिणीला समजल्यानंतर पती-पत्नीमध्ये भांडण होत होते. दोघांच्या प्रेमाला कंटाळून अभिषेकची पत्नी माहेरी निघून गेली होती. परंतु, श्यामा अभिषेकला सोडायला तयार नव्हती. कुटुंबातील प्रेमसंबंधामुळे भांडणे होत होती. प्रेमाच्या त्रिकोणातून अभिषेकला जीव गमवावा लागला.

Video : कुछ-कुछ होण्यापूर्वीच मिळाली नोटीस...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder of police in love affair at rajasthan