इचलकरंजी-बोरगाव रस्त्यावर कवठेमहांकाळ येथील महिलेचा खून 

राजेंद्र हजारे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

निपाणी - महिलेचा गळा दाबून खून केल्याची घटना इचलकरंजी-बोरगाव रस्त्यावर घडली आहे .रविवारी (ता. १२) पहाटे ही घटना उघडकीस आली. दिशा दिनेश पाटील (वय ३७, रा. कवठेमहांकाळ) असे या महिलेचे नाव आहे.

निपाणी - महिलेचा गळा दाबून खून केल्याची घटना इचलकरंजी-बोरगाव रस्त्यावर घडली आहे .रविवारी (ता. १२) पहाटे ही घटना उघडकीस आली. दिशा दिनेश पाटील (वय ३७, रा. कवठेमहांकाळ) असे या महिलेचे नाव आहे.

तिच्या अंगावर जीन्स पॅन्ट व टॉप आहे. शिवाय पर्समध्ये जन्मकुंडली सापडली आहे. जन्मकुंडली व विविध कागदपत्रांच्यावरून तिची आेळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक चौकशीनंतर तिचा गळा दाबून खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात तिचा खून करून कर्नाटक हद्दीत आणून टाकल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी फौजदार संगमेश दिडगीनहाळ व सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. सदलगा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपासासाठी पोलीस पथक कवठेमहांकाळकडे रवाना झाले आहे.

Web Title: Murder of women on Ichalkaraji Borgaon Road