क्षुल्लक करणातून बेळगावात तरुणाचा  खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

बेळगाव : तरुणाचा खून झाल्याची घटना आज सकाळी आठच्या सुमारास नेहरू नगर येथे उघडकीस आली. गणेश ऊर्फ बसवराज यल्लाप्पा काकती (वय 22, रा. नेहरूनगर पहिला क्रॉस) असे मृताचे नाव आहे. बसवराजकडे असलेला कॅमेरा त्याच्या मित्राने मागितला होता. परंतु तो देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये भांडण झाले यातूनच चाकूने हल्ला केल्याचा संशय प्राथमिक तपासात व्यक्त केला आहे नेमके हेच कारण आहे की अभय कोणते याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असले तरी याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी की, बसवराज हा सेल्समन म्हणून काम करतो. तो मूळचा गोकाक तालुक्यातील नेलगट्टी येथील असून तो येथे मावशीकडे राहतो. शुक्रवारी (ता. १) रात्री दहाच्या सुमारास तो जेवण करून फिरण्यासाठी बाहेर पडला त्यानंतर तो घराकडे परतलाच नाही. आज सकाळी आठ वाजता नेहरूनगर पहिल्या क्रॉसवरील पीके क्वाटर्सच्या खाली मृतदेह पडल्याचे दिसले. ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तो मृतदेह बसवराजचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या छातीवर व पोटावर चाकूचे वार दिसत आहेत. त्याचा अन्यत्र खून करून मृतदेह या ठिकाणी आणून टाकल्याचा संशय पोलिसांना आहे.

पोलीस आयुक्त  डॉ. डी सी राजप्पा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खुन्यांना लवकरच अटक केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी गुन्हे विभागाचे डीसीपी बी एस पाटील, मार्केटचे एसीपी विनय गावकर, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक रमेश हनापूर यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

Web Title: the murder of the young person in belgaum