'जय श्रीराम' न म्हणणाऱ्या मुस्लिम तरुणाला मारहाण 

वृत्तसंस्था
रविवार, 30 जून 2019

मोहम्मद ताज हा नमाज अदा करून घरी परतत असताना त्याला तीन ते चार अज्ञात दुचाकीस्वारांनी अडविले. तसेच, त्याने परिधान केलेल्या पारंपरिक टोपीलाही आक्षेप घेतला. त्यानंतर ताज याला "जय श्रीराम'च्या घोषणा देण्यास सांगितले.

कानपूर (उत्तर प्रदेश) : "जय श्रीराम'च्या घोषणा देण्यास नकार देणाऱ्या 16 वर्षांच्या एका मुस्लिम तरुणाला अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. कानपूरमधील किडवईनगर येथे शुक्रवारी ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मोहम्मद ताज हा नमाज अदा करून घरी परतत असताना त्याला तीन ते चार अज्ञात दुचाकीस्वारांनी अडविले. तसेच, त्याने परिधान केलेल्या पारंपरिक टोपीलाही आक्षेप घेतला. त्यानंतर ताज याला "जय श्रीराम'च्या घोषणा देण्यास सांगितले. मात्र, त्यास ताज याने नकार दिल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली, अशी माहिती पोलिस अधिकारी सतीश कुमार सिंह यांनी दिली. 

हल्लेखोरांनी माझ्या डोक्‍यावरील टोपी काढून मला "जय श्रीराम'च्या घोषणा देण्यास सांगितले; मात्र त्यास मी नकार दिल्यानंतर त्यांनी मला मारहाण करण्यास सुरवात केली, असे ताज याने "पीटीआय'शी बोलताना सांगितले. मी काही दुकानदारांकडे मदतीसाठी याचना केली. रस्त्यावरून जाणारे काही जण मदतीसाठी धावल्यानंतर हल्लेखोर पळून गेले, असे ताज म्हणाला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslim Boy Thrashed For Refusing To Chant Jai Shri Ram In Kanpur