भगवदगीता वाचणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला मारहाण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जुलै 2019

गेल्या 38 वर्षांपासून धार्मिक पुस्तकं वाचत असल्याचं दिलशेर यांनी सांगितलं. 'मी मुस्लिम आहे. पण माझा धर्म मला इतर धर्माचे पवित्र ग्रंथ वाचण्यापासून रोखत नाही,' असे देखील ते म्हणाले. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अलिगढचे पोलीस अधीक्षक अभिषेक यांनी दिली.

आग्रा : उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये श्रीमद भगवद गीता वाचणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला मारहाण झाल्याची घटना घडली असून, मुस्लिम समाजातील व्यक्तींनीच त्याला मारहाण केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मु्लिम व्यक्ती व्यक्ती स्वत:च्या घरी भगवद्गीता वाचत असताना हा प्रकार घडला. एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे 55 वर्षीय दिलशेर गुरुवारी घरी परतले. त्यानंतर त्यांनी भगवद्गीता वाचण्यास सुरुवात केली. त्यावेळी समीर, झाकीर आणि काही तरुण दिलशेर यांच्या घरात घुसले. त्यांनी दिलशेर यांना मारहाण केली आणि त्यांच्या घरातील गीता, रामायण आणि हिंदू धर्माशी संबंधित ग्रंथ घेऊन निघून गेले.

गेल्या 38 वर्षांपासून धार्मिक पुस्तकं वाचत असल्याचं दिलशेर यांनी सांगितलं. 'मी मुस्लिम आहे. पण माझा धर्म मला इतर धर्माचे पवित्र ग्रंथ वाचण्यापासून रोखत नाही,' असे देखील ते म्हणाले. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अलिगढचे पोलीस अधीक्षक अभिषेक यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslim man thrashed for reading Bhagavad Gita in Aligarh