
देशभर दंगे, काश्मीरात सलोखा; हिंदू जवानाच्या पार्थिवाला मुस्लिमांनी दिला खांदा, अनोखा आदर्श ठेवला
श्रीनगर, ता. ३१ : कुलगाम जिल्ह्यातील करकन गावात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) एका जवानाच्या अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम नागरिकांनी पुढाकार घेतला. बलबीर सिंग असे त्यांचे नाव आहे.
ते ५५ वर्षांचे होते. भाऊ सतीशकुमार याच्या पहिल्या वर्षश्राद्धासाठी ते गावी आले होते. त्यांच्या भावाला गेल्या वर्षी ३१ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी मारले होते. बलबीर यांची नियुक्ती अमृतसरमध्ये होती. ते रजा घेऊन गावी आले होते.
त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. करकन हे हिंदू राजपूत होते. गावात त्यांचे एकमेव हिंदू कुटुंब आहे. त्यामुळे त्यांच्या मुस्लीम मित्रांनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. मुस्लिमांनीच त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला.
याशिवाय मुस्लीमांनी अंत्यसंस्कारासाठी लाकडांची सुद्धा व्यवस्था केली. सीआयएसएफच्या एका पथकाने बलबीर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.