मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची आता महिला आघाडी

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

कोलकाता : भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तोंडी तलाकला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच या ज्वलंत मुद्यावर लक्ष ठेवण्यासाठी महिला आघाडी स्थापन करण्याचाही निर्णय घेतला असून, तीन दिवसांच्या अधिवेशनात याबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे.

सरकार मुस्लिमांच्या कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप या अधिवेशनात करण्यात आला. नव्याने स्थापण्यात आलेली महिला आघाडी आता कौटुंबिक कलह आणि शिक्षण यांसारख्या अन्य मुद्यांवरही काम करणार असल्याचे माहिती सचिव झाफरयाब जेल्लानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. लवकरच अखिल भारतीय मुस्लिम महिला हेल्पलाइन सुरू करण्यात येणार असून, ही सेवा विनामूल्य असणार आहे. ऊर्दू, इंग्रजी आणि अन्य आठ प्रादेशिक भाषांमध्ये ती सुरू करण्यात येणार असून, याद्वारे मुस्लिम महिलांना कौटुंबिक कलहाबाबत दारुल-काझाकडे जाण्याबाबत सल्ला आणि मार्गदर्शन केले जाणार आहे.

Web Title: muslim personnel law board's women wing