'मी असताना तू त्याच्याशी..'; कासिमनं घरात घुसून हिंदू मुलीवर झाडल्या गोळ्या, प्रकृती चिंताजनक I Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

याप्रकरणी नंद नगरी (FIR) पोलिस ठाण्यात (Nand Nagri Police Station) एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

Crime News : 'मी असताना तू त्याच्याशी..'; कासिमनं घरात घुसून हिंदू मुलीवर झाडल्या गोळ्या, प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली : दिल्लीतील नंद नगरी भागात सोमवारी रात्री एका मुस्लिम तरुणानं घरात घुसून एका हिंदू तरुणीवर गोळ्या झाडल्या आहेत. मुलीचा दोष इतकाच की, ती दुसऱ्या मुलासोबत फोनवर बोलत होती.

आरोपी कासिमनं तरुणीवर गोळ्या झाडून घटनास्थळावरून पलायन केलं. त्यानंतर जखमी अवस्थेत मुलीला जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. मुलीच्या खांद्याला गोळी लागली आहे.

दोघांमध्ये खूप दिवसांची 'मैत्री'

याप्रकरणी नंद नगरी (FIR) पोलिस ठाण्यात (Nand Nagri Police Station) एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. जखमी तरुणी तिच्या आईसोबत नंद नगरी परिसरात राहते. तिच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं आहे. आई ही घरगुती मदतनीस आहे. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी तिच्या घरी होती, त्यामुळं त्यांच्या शेजारी राहणारा कासीम त्यांच्या घरी पोहोचला. या दोघांची खूप दिवसांपासून मैत्री आहे.

दोघांमध्ये झाला मोठा वाद

कासिमनं मुलीला सांगितलं की, मी असताना तू इतर कोणत्याही तरुणाशी मैत्री करू शकत नाहीस. यामुळं दोघांमध्ये मोठा वाद झाला. आरोपीनं मुलीचा फोन हिसकावून घेत डायल लिस्ट तपासली. यात त्याला अनोळखी नंबर दिसला. त्या नंबरवर फोन केला असता, एका तरुणानं उचलला. यामुळं कासीम संतप्त झाला. त्यानं पिस्तुलातून मुलीच्या खांद्यावर गोळी झाडली. गोळी लागताच मुलगी जमिनीवर कोसळली आणि आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. शेजाऱ्यांनी ही बाब पोलिसांना कळवली. मुलीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिस गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.