यूपीतील भाजपच्या विजयानंतर वाटली मिठाई; मुस्लिम युवकाची मारहाण करुन हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यूपीतील भाजपच्या विजयानंतर वाटली मिठाई; मुस्लिम युवकाची मारहाण करुन हत्या

यूपीतील भाजपच्या विजयानंतर वाटली मिठाई; मुस्लिम युवकाची मारहाण करुन हत्या

लखनऊ: उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमधअये एका भाजप समर्थक मुस्लिमाची हत्या करण्यात आली आहे. रामकोला ठाण्यामधील कठघरही गावामध्ये बाबर नावाच्या एका व्यक्तीने भाजपच्या एकहाती विजयाचा आनंद साजरा करत मिठाई वाटली होती. यामुळे त्याचे शेजारी नाराज झाले आणि त्यांनी बाबरची मारहाण करत हत्या केल्याचा आरोप आहे. मृत बाबरच्या पत्नीने रामकोला पोलिस ठाण्यामध्ये आरोपींविरोधात खटला दाखल केला आहे. या संदर्भात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या व्यक्तीच्या मृत्यूवर ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याचा विश्वासही दिला आहे. (Uttar Pradesh)

हेही वाचा: खळबळजनक! नाशिकमध्ये बंद गाळ्यात सापडले मानवी अवयव

साजरा केला भाजपच्या विजयाचा आनंद

भाजपच्या विजयाचा आनंद व्यक्त केल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी ज्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांची नावे आरिफ पुत्र अजीमुल्ला आमि ताहिद पुत्र इशा अशी आहेत. माध्यमांमध्ये या प्रकरणी राळ उठल्यानंतर पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. याआधी घटना घडून पाच दिवस झाले तरीही पोलिसांनी याबाबत कसलीच कारवाई केली नव्हती. ज्या मुस्लिम युवकाची हत्या झाली आहे, त्याने विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा प्रचार केला होता तसेच भाजपचं सरकार सत्तेत आल्यानंतर गावामध्ये मिठाई देखील वाटली होती. याचाच राग येऊन त्याची मारझोड करुन हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. (Yogi Adityanath)

हेही वाचा: शंभर दिवस, सहा महिने अन् वर्षाचे लक्ष्य; योगींचा प्रत्येक खात्याला आदेश

कुटुंबियांचा आक्रोश

या मुस्लिम युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्यामुळे तो जबर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्याला लखनऊला हलवण्यात आलं जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना गेल्या 20 मार्चची आहे. या व्यक्तीचा मृतदेह जेंव्हा गावामध्ये आणला गेला तेंव्हा लोकांनी मोठा आक्रोश केला. तसेच त्यावर अंतिम संस्कार करणार नाही, असं सांगितलं. या प्रकरणाला राजकीय आणि धार्मिक रंग असल्याने संवेदनशील बनलं असून याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.

Web Title: Muslim Youth Killed By Neighbours For Celebrating Bjp Victory In Kushinagar District Of Uttar Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top