बिहारमध्ये दिसली माणुसकी, मुस्लिम कुटूंबाने केले हिंदू माणसावर अंत्यसंस्कार

एका मुस्लिम कुटुंबाने बंधुभाव आणि मानवतेचा एक वेगळा आदर्श घालून दिला आहे
hindu muslim
hindu muslimsakal

धर्मापेक्षा माणूसकी महत्त्वाची असते. बिहार येथील राजाबाजार येथील सबनपुरा येथील एका मुस्लिम कुटुंबाने बंधुभाव आणि मानवतेचा एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. शुक्रवारी हिंदू धर्मीय ७५ वर्षीय रामदेव यांचे निधन झाले. यावेळी अरमानचे कुटुंबीय आणि आजूबाजूच्या मुस्लीम समाजातील लोकांनी सहकार्य करून रामदेव यांच्या अंतयात्रेची तयारी केली आणि त्यांच्या शवाला खांदा लावून स्मशानभूमीत नेले. यानंतर हिंदू प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामदेव यांच्या अशा अचानक जाण्याने अरमानच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. रामदेव यांना रक्ताच्या नात्यांचे कोणीही नसल्याचे सांगण्यात आले आहे.

hindu muslim
Gujarat : गोध्रा हत्याकांडातील आरोपीला 20 वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा

रामदेव यांचे सर्व काही अरमान आणि त्याचे कुटुंब होते. रिजवान सांगतात की , रामदेवसाह हे मला माझ्या वडिलांसारखे होते. रामदेव यांच्या निधनाने रिझवानच्या संपूर्ण कुटुंबात शोककळा पसरली आहे.

hindu muslim
RTIमध्ये खुलासा! ना ताजमहलमध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती, ना मंदिरांच्या जागेवर ताजमहल

मो. रिजवानने सांगितले की, रामदेव साह यांना २५ वर्षांपूर्वी एक व्यक्ती घेऊन आली होती. रामदेव हे कामाच्या शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी माझे दुकान बुद्ध प्लाझा येथे मदिना होजियरी नावाने होते. रामदेव यांची परिस्थिती पाहून मी क्षणांचाही विलंब न करता त्यांना माझ्या दुकानावर कामाकरता ठेवून घेतले. रामदेव हे सुशिक्षित गृहस्थ होते. त्यामुळे माझ्या दुकानाचे काउंटर सांभाळण्याचे काम ते करत असतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com