मुस्लिम बांधवांनी केले हिंदू नागरिकावर अंत्यसंस्कार

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

शेखापूर (बिहार)- मुस्लिम बांधवांनी एकत्र येत एका हिंदू नागरिकावर मंगळवारी (ता. 25) अंत्यसंस्कार करून समाजातील एकता दाखवून दिली आहे.

बिस्वजीत रजक या नागरिकाचे सोमवारी (ता. 24) रात्री निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबाची अर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती. शिवाय, त्यांच्या नातेवाईकांकडेही पुरेसे पैसे नव्हते. याबाबतची माहिती समजल्यानंतर परिसरातील मुस्लिम बांधव एकत्र आले व त्यांनी पैसे गोळा केले. शिवाय, त्यांना खांदा देत हिंदू रुढीपरंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार केले.

बिस्वजीतची आई म्हणाली, 'आमच्या मुलाचे निधन झाल्याने आम्ही दुःखात बुडालो होतो. शिवाय, अंत्यसंस्कार करण्यासाठीही आमच्याकडे पैसे नव्हते. यामुळे आम्ही रात्रभर पार्थिवाजवळ बसून होतो. मंगळवारी सकाळी मुस्लिम बांधव घरी आले व त्यांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. मृतदेह बांधल्यानंतर आठ किलोमीटर अंतर चालत नेऊन त्यांनी अंत्यसंस्कार केले. शिवाय, चालत असताना 'बोलो हरी हरी बोल' असेही बोलत होते.'

'गावामध्ये मुस्लिम बांधवाची लोकसंख्या मोठी असून, गावात फक्त तीनच हिंदू राहतात. परंतु, हिंदू-मुस्लिम कुटुंबे दोन भावंडांप्रमाणे गावात नांदत आहेत, असे अश्रफ या युवकाने सांगितले.

Web Title: Muslims helped with the funeral ceremony of a Hindu man

टॅग्स