केंद्रीयमंत्र्यांचे मुस्लिमांबाबत वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले...

वृत्तसंस्था
Friday, 21 February 2020

- नागरिकता संशोधन कायद्यासंदर्भात (सीएए) पाकिस्तान जी भाषा बोलत आहे, तीच भाषा आता काँग्रेस, जेडीयू आणि कम्युनिस्टकडून केली जातेय.

नवी दिल्ली : देशातील सर्व मुस्लिमांना 1947 मध्येच पाकिस्तानला पाठवून द्यायला हवं होतं, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे. तसेच नागरिकता संशोधन कायद्यासंदर्भात (सीएए) पाकिस्तान जी भाषा बोलत आहे, तीच भाषा आता काँग्रेस, जेडीयू आणि कम्युनिस्टकडून केली जात आहे, असेही ते म्हणाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुर्णिया येथे पत्रकारांशी बोलताना गिरीराज सिंह यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, देशातील सर्व मुस्लिमांना 1947 मध्येच पाकिस्तानला पाठवून द्यायला पाहिजे होते. तसेच देशात नागरिकता संशोधन कायद्याच्या आडून भारतविरोधी अजेंडा राबविण्यात येत आहे.  पाकिस्तानकडून नागरिकता संशोधन कायद्यासंदर्भात जी भाषा बोलली जात आहे, तीच भाषा आता काँग्रेस, जेडीयू आणि कम्युनिस्ट बोलत आहे, असेही ते म्हणाले.

Image result for Giriraj singh

याशिवाय दिल्लीतील शाहीन बागेत शरजील इमाम याने जे वक्तव्य केले, त्याबाबतही त्यांनी भाष्य केले. 

पेट्रोलच्या दरात वाढ; नवे दर शंभरी पार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslims Should Have Been Sent To Pakistan In 1947 Says Union Minister Giriraj Singh