मुतालिकांचे विधान चीड आणणारे : कॉंग्रेस 

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणासंदर्भात असंवेदनशील वक्तव्य केलेले श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्यावर कॉंग्रेसने आज कडाडून टीका केली. मुतालिक यांच्या वक्तव्याचा तरी निषेध पंतप्रधान मोदी करणार का, असा प्रश्‍न कॉंग्रेसने विचारला आहे. 

बंगळूर : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणासंदर्भात असंवेदनशील वक्तव्य केलेले श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्यावर कॉंग्रेसने आज कडाडून टीका केली. मुतालिक यांच्या वक्तव्याचा तरी निषेध पंतप्रधान मोदी करणार का, असा प्रश्‍न कॉंग्रेसने विचारला आहे. 

एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान काल (ता. 17) मुतालिक यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. "गौरी लंकेश यांच्या हत्या हिंदुत्ववादी संघटनांनी केल्याचा आरोप सर्व करत आहेत. मात्र, महाराष्ट्रात दोन आणि कर्नाटकात दोन हत्या झाल्या, त्या वेळी दोन्हीकडे कॉंग्रेसचे सरकार होते. त्या सरकारला कोणी जाब विचारला नाही. आता मात्र, लंकेश यांच्या मृत्यूप्रकरणी पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे, अशी मागणी डाव्या विचारसरणीचे विचारवंत करत आहेत.

कर्नाटकात कुत्रा जरी मेला तरी त्याचे स्पष्टीकरण मोदींनी द्यायचे का?', असे मुतालिक म्हणाले होते. लंकेश यांच्या हत्येची तुलना कुत्र्याबरोबर केल्याने त्यांच्यावर टीका झाली. "हे विधान अत्यंत चुकीचे, चीड आणणारे आणि खेदजनक आहे. मोदीजी, तुम्ही लंकेश यांच्या हत्येचा निषेध केला नव्हता, मुतालिक यांच्या विधानावर तरी बोलणार का?, ' असे ट्विट कॉंग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केले आहे. 

Web Title: Mutalik's statement is provoked says Congress