माझे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार - येडियुरप्पा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 'माझे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, तसेच आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू, असा दावा येडियुरप्पा यांनी केला.  

बंगळूर : भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी आज (ता. 17) सकाळी राज्यपाल वजुभाई वाला यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. येडियुरप्पा हे तिसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आहेत. भाजपला या निवडणुकीत 104 जागा मिळाल्या व आता बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 'माझे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, तसेच आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू, असा दावा येडियुरप्पा यांनी केला.  

दरम्यान याविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, पण सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पांच्या शपथविधीस स्थगिती देण्यास नकार दिला. येडियुरप्पांच्या शपथविधी वेळी काँग्रेस व जेडीएसच्या आमदारांनी विधीमंडळाबाहेर महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करत निदर्शने केली. या आंदोलनात काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत हे सहभागी होते.

भाजपने केलेले कृत्य हे लोकशाही विरोधी असल्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी सांगितले. तर राज्यपालांनी सत्तास्थपनेसाठी भाजपला प्रथन आमंत्रण दिल्याने काँग्रेस व जेडीएस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.  

 

Web Title: my govt will complete 5 years says CM Yeddyurappa