जयललिता असत्या तर त्यांची हिंमत झाली नसती- राव

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

द्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी बंदुकीच्या धाकावर मला घरात नजरकैदेत ठेवले आहे. मला ठरवून लक्ष्य करण्यात येत आहे, माझा जीव धोक्यात आहे. माझे नाव कोठेही नसताना माझ्या घराची चौकशी करण्यात आली.

चेन्नई - मला बंदुकीच्या धाकावर घरात नजरकैदेत ठेवण्यात आले असून, माझा जीव धोक्यात आहे. आज जयललिता तमिळनाडूच्या मुख्यमंत्री असत्या तर कोणाची हिंमत झाली नसती, असे वक्तव्य तमिळनाडूचे माजी मुख्य सचिव पी. राममोहन राव यांनी केले आहे.

उद्योगपती शेखर रेड्डी यांच्याशी संबंध असल्याच्या कारणावरून राव यांना मुख्य सचिव पदावरून हटविण्यात आले आहे. रेड्डी यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा आणि सोने सापडले होते. सध्या ते अटकेत आहेत. यानंतर राव यांच्या निवासस्थानीही प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता.

आज (मंगळवार) राव यांनी सरकारवर टीका केली आहे. राव म्हणाले, की केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी बंदुकीच्या धाकावर मला घरात नजरकैदेत ठेवले आहे. मला ठरवून लक्ष्य करण्यात येत आहे, माझा जीव धोक्यात आहे. माझे नाव कोठेही नसताना माझ्या घराची चौकशी करण्यात आली. सर्च वॉरंटमध्ये माझ्या मुलाचे नाव होते. तो सध्या येथे राहत नाही, तो अमेरिकेत असतो. मी अजूनही तमिळनाडूचा मुख्य सचिव आहे. माझे शेखर रेड्डी यांच्याशी काहीही संबंध नाहीत. प्राप्तीकर विभागाला माझ्या घरात फक्त 1 लाख 12 हजार रुपये रोख आणि काही सोने सापडले. ते माझ्या पत्नी व मुलीचे आहे.  

Web Title: My life is in danger, says former Chief Secretary P. Rama Mohana Rao