माझा विवाह पक्षाशी : राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

माझा विवाह पक्षाशी आहे. लग्नाबाबत आता कोणताही विचार नसून, सध्याचे ध्येय फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून खाली खेचणे, हेच आहे.

- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विवाहावरून विविध चर्चा सुरु असताना आता स्वत: राहुल गांधी यांनी माझा विवाह पक्षाशी असल्याचे स्पष्ट केले. तसेच लग्नाबाबत आता कोणताही विचार नसून, सध्याचे ध्येय फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून खाली खेचणे, हेच आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी हैदराबाद येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ''आगामी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये नरेंद्र मोदी सरकारविरोधात लढण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव करण्याचे आमचे ध्येय आहे. आम्ही काही समविचारधारा असलेल्या पक्षासोबत चर्चा करत आहोत. तसेच आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहोत. भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. जेव्हा हे ध्येय पूर्ण होईल, तेव्हा पुढील पंतप्रधान कोण याबाबत चर्चा केली जाईल. सध्या याबाबत आम्ही कोणताही विचार केलेला नाही''. 

दरम्यान, पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा सत्तेवर येतील की नाही, याबाबत अद्याप काहीही स्पष्टपणे सांगता येणार नाही. शिवसेनेसह इतर काही पक्ष पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्मबाबत त्यांना विरोध करत आहेत.

Web Title: My marriage to the party says Rahul Gandhi