'युपी'त भाजपला नोटाबंदीचा फायदा होणार नाही: काटजू

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जानेवारी 2017

नवी दिल्ली : "उत्तर प्रदेशमध्ये 2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींची लाट होती. सध्या तेथे कोणतीही लाट नाही. नोटाबंदीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र गरीब, शेतकरी आणि सामान्यांना त्याचा फटका बसल्याने त्यामध्ये भारतीय जनता पक्ष अपयशी ठरला आहे. माझे वैयक्तिक निरीक्षण असे आहे की यंदा अखिलेश यादव यांच्या नेतृत्वखालील समाजवादी पक्षाला बहुमत मिळेल', असा अंदाज सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी व्यक्त केला आहे.

काटजू यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीबाबतचा अंदाज व्यक्त करणारी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी त्यात काही निरीक्षणे नोंदविली आहेत. त्यात म्हटले आहे की, "यंदा कोणतीही लाट नसल्याने उत्तर प्रदेशमधील परंपरेप्रमाणे तेथे जात आणि धर्मावर आधारित मतदान होईल. एखाद्या उमेदवाराला जिंकण्यासाठी 50 टक्के नव्हे तर केवळ 30 टक्के मतदानाची आवश्‍यकता असते. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्‍य या उच्च जातीतील मतदार ही भाजपची व्होट बॅंक आहे. त्यांचे प्रमाण 18-20 टक्के आहे. अनेक जातींचा समावेश असलेल्या इतर मागसवर्गीय प्रवर्गाचे मतदान 5-6 टक्के आहे. त्यामुळे भाजपला जास्ती जास्त 25-26 टक्के मतदान होईल. समाजवादी पक्षात पडलेली फूट पक्षाला हानीकारक ठरेल, असे काही जणांचे मत आहे. मात्र, माझ्या मते त्यामुळे पक्षाला लाभ होईल. यंदा राज्यातील मुस्लिम मतदार अखिलेश यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाकडेच वळतील. अखिलेश यादव यांनी ऑस्ट्रेलियातील एम.टेक. पदवी मिळविलेली असून त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. समाजवादी पक्षाला दोन तृतीयांश मतदान मिळेल आणि बहुतमताने समाजवादी पक्षच निवडणूक जिंकेल.'

Web Title: My own prediction is a clear majority for the Samajwadi Party led by Akhilesh Yadav - Katju