मी, काय करू; बायको फक्त लाडू देते...

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

तुम्हीच सांगा. मी, काय करू. माझी पत्नी मला फक्त लाडूच खायला देते. लाडू शिवाय काही देत नाही.

मेरठ (उत्तर प्रदेश): तुम्हीच सांगा. मी, काय करू. माझी पत्नी मला फक्त लाडूच खायला देते. लाडू शिवाय काही देत नाही, मला तिच्यापासून वेगळे व्हायचे आहे, अशी तक्रार एक पती कौटुंबिक न्यायालयात सांगत होता.

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील कौटुंबिक न्यायालात घटस्फोटासाठी एक याचिका दाखल झाली आहे. दोघांचा 10 वर्षांपूर्वी विवाह झाला असून, त्यांना तीन मुले आहेत.

पतीने म्हटले आहे की, 'काही दिवसांपूर्वी माझी तब्येत खराब झाली होती. त्यानंतर पत्नी एका मांत्रिकाकडे गेली. तेंव्हापासून ती फक्त मला लाडू खायला देते. सकाळी चार आणि संध्याकाळी चार. याशिवाय काहीही खायला देत नाही. लाडू खावून मला कंटाळा आला आहे. तिला अनेकदा समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, काही फरक पडत नाही, आता घटस्फोट हवा आहे.'

'आम्ही त्या जोडप्याला समुपदेशन करण्यासाठी बोलवू शकतो. आम्हाला विश्वास आहे की, लाडूमधून नवऱयाची सुटका होऊ शकते,' असे एका सल्लागाराने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My Wife Only Gives me Laddoos To Eat says up man