मोदींच्या पदवीचे गूढ वाढत आहे - केजरीवाल

वृत्तसंस्था
रविवार, 19 जून 2016

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कला शाखेतील पदवीबाबत माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यास दिल्ली विद्यापीठाने नकार दिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींच्या पदवीचे गूढ आणखी वाढत असल्याचा म्हणत सरकारवर टीका केली आहे. 

मोदी यांच्या पदवीबाबत दिल्ली विद्यापीठाला एका वकिलाने विचारलेल्या प्रश्‍नाची उत्तरे देता येत नसल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. ‘दिल्ली विद्यापीठातील संबंधित विद्यार्थ्याची माहिती ही खाजगी असून ती सार्वजनिक करण्याचा आणि जनहिताचा काहीही संबंध नाही‘, असे विद्यापीठाने कळविले आहे. या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी मोदींच्या पदवीबाबतचे गूढ आणखी वाढत जात असल्याचे म्हटले आहे. तसेच विद्यापीठाने माहिती नाकारल्याबाबत ते म्हणाले, ‘पण का? अमित शहा आणि जेटलीजी म्हटले नाहीत का की ही पदवी खरी आहे आणि कोणीही ती दिल्ली विद्यापीठातून घेऊ शकतो?‘ असा प्रश्‍नही केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: mystery around modi's degree