रिझर्व्ह बॅंकेला शाईच्या बाटल्यांचा पुरवठा सुरू

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

म्हैसूर: सरकारी मालकीच्या म्हैसूर पेंट्‌स व वॉर्निश लिमिटेडने केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार रिझर्व्ह बॅंकेला शाईचा पुरवठा सुरू केला आहे.

म्हैसूर: सरकारी मालकीच्या म्हैसूर पेंट्‌स व वॉर्निश लिमिटेडने केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार रिझर्व्ह बॅंकेला शाईचा पुरवठा सुरू केला आहे.

कंपनीचे अध्यक्ष एच. ए. वेंकटेश म्हणाले, "प्रत्येकी पाच मिलीलिटरच्या 30 हजार पुसट न होणाऱ्या शाईच्या बाटल्या रिझर्व्ह बॅंकेकडे पाठविण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार अनेक बॅंकांनी या शाईची मागणी नोंदविली आहे. बॅंकांना थेट शाईचा पुरवठा करता येत नसल्याने त्या रिझर्व्ह बॅंकेमार्फत घ्याव्या लागतील. आतापर्यंत 2 लाख 96 हजार 500 बाटल्यांची मागणी कंपनीकडे नोंदविण्यात आली आहे. त्यांची किंमत साडेतीन कोटी रुपये आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानंतर उत्पादन वाढविण्यात आले आहे. कंपनी आठवडाभरात ही मागणी पूर्ण करेल. एका शाईच्या बाटलीतून पाचशे जणांच्या बोटावर खूण करता येते.''

पाच राज्यातील निवडणुकांत मार्कर?
देशभरात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. यासाठी पाच लाख शाईच्या बाटल्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकांत शाईऐवजी मार्कर वापरण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू केला आहे. यावर डिसेंबर महिन्यातील बैठकीत निर्णय होणार आहे. कंपनीने मार्करवर संशोधन केले असून, शाईऐवजी मार्कर वापरल्यास खर्चात 50 टक्के कपात होईल.

Web Title: Mysuru indelible ink firm sees unseasonal orders