विवाह समारंभात एके-56 आणि एम-16 रायफलसोबत वधु-वराने काढले फोटो, गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

याचे फोटो व्हायरल होताच दिमापुर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

नागालॅंड : भर विवाह समारंभातच वधु-वराने स्वयंचलित एके-56 आणि एम-16 रायफलसोबत फोटो काढल्याचा प्रकार नागालॅंडमधील दीमापूर येथे घडला आहे. याचे फोटो व्हायरल होताच दिमापुर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

नागालॅंडमधील विद्रोही समुह नॅशनल सोशलिस्ट काऊंसिल ऑफ नागालॅंड-यूनिफिकेशन(एनएससीएन-यू)चे नेते किबाच्या यांच्या मुलाचा हा विवाह समारंभ होता. या संघटनेसोबत केंद्र सरकारची सध्या शांतता करारावर चर्चा सुरु आहे. याबाबत दिमापुरचे पोलिस आयुक्त रोथिहु टेटसो यांनी सांगितले आहे की, या प्रकरणी आम्ही चौकशी करत असून लवकरच कारवाई केली जाईल.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagaland nscn-u leaders son bride flaunt assault rifles at wedding reception