नागरोटा येथील लष्कराच्या तळावर हल्ला;2 जवान जखमी

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

नागरोटा येथे 166 फिल्ड आर्मी रेजिमेंटचा तळ आहे. या तळावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे.

जम्मू - शहराजवळील नागरोटा येथील लष्कराच्या तळावर आज (मंगळवार) पहाटे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले आहेत.

लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरोटामधील व्हाईट नाईट कॉर्प्स येथील लष्कराच्या तळावर पहाटे चारच्या दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. तीन दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला असून, जवानांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. जखमी झालेल्या दोन जवानांपैकी एका जवानाची प्रकृती गंभीर असून, त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागरोटा येथे 166 फिल्ड आर्मी रेजिमेंटचा तळ आहे. या तळावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. परिसरातील सर्व शाळा व कार्यालय आज बंद ठेवण्यात आली असून, सुरक्षा रक्षकांनी परिसराला वेढा घातला आहे.

Web Title: Nagrota attack: Militants strike army camp in Jammu, one jawan dead, two injured