नवाज पठण रस्त्यावर नको : मनोहरलाल खट्टर

वृत्तसंस्था
रविवार, 6 मे 2018

"'नमाज पठण रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी नको तर मशिद आणि इदगाहमध्ये करायला हवे''.

- मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, हरियाना

गुडगाव : हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नमाज पठणावर आज (रविवार) भाष्य केले. खट्टर म्हणाले, नमाज पठण रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी नको तर मशिद आणि इदगाहमध्ये करायला हवे. गुडगावमध्ये नमाज पठणावेळी झालेल्या वादाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले.  

namaz in masjid

कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे सरकारचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. याशिवाय ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. उघड्यावर नमाज पठण केल्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नमाज पठण मशिद किंवा इदगाहमध्ये करायला हवे. हरियाणामधील गुडगावमध्ये काही दिवसांपूर्वी नमाज पठण विस्कळीत झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. वझिराबाद, अतुल कटारिया चौक, सायबर पार्क, बखत्वार चौक आणि दक्षिण शहरात नमाज पठणादरम्यान वाद निर्माण झाला होता. 

त्यादरम्यान विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू क्रांती दल, गौरक्षक दल आणि शिवसेना या पक्षांच्या कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले होते. त्यानंतर या घटनेबाबत खट्टर यांना विचारले असता नमाज पठण रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी करायला नको तर मशिद आणि इदगाहमध्ये करायला हवे, असे सांगितले. 

Web Title: Namaz should be read in mosques not on roads says CM Manohar Lal Khattar