'पाच रुपये द्या अन् नरेंद्र मोदींना भेटा'

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

आपल्याला जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायची इच्छा असेल तर, आता हे अगदी सहज शक्य होणार आहे. आता मोदींना तुम्हाला भेटायची इच्छा असेल तर, हे शक्य आहे आणि त्यासाठी तुम्हाला केवळ पाच रुपये मोजावे लागणार आहेत. तुम्ही हे पाच रुपये दिल्यावर तुम्हाला सोबत एक टी-शर्ट आणि एक कॉफी मग मिळू शकतो.

नवी दिल्ली- आपल्याला जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायची इच्छा असेल तर, आता हे अगदी सहज शक्य होणार आहे. आता मोदींना तुम्हाला भेटायची इच्छा असेल तर, हे शक्य आहे आणि त्यासाठी तुम्हाला केवळ पाच रुपये मोजावे लागणार आहेत. तुम्ही हे पाच रुपये दिल्यावर तुम्हाला सोबत एक टी-शर्ट आणि एक कॉफी मग मिळू शकतो.

यासाठी तुम्हाला नमो अॅपवर डोनेशन द्यावे लागणार आहे. पंतप्रधानांच्या वैयक्तिक नरेद्र मोदी (नमो) अॅपवर भारतीय जनता पक्षाला डोनेशन द्यावे लागणार आहे. तुम्ही पाच रुपयांपासून ते जास्तीत जास्त 1000 रुपयांपर्यंत तुम्हाला हे डोनेशन देता येऊ शकते. 

तुम्ही हे पैसे नमो अॅपच्या सहाय्याने डोनेट केल्यानंतर तुम्हाला एक रेफरल कोड मिळेल, हा कोड तुम्हाला व्हाट्सअॅप किंवा एसएमएसच्या सहाय्याने 100 लोकांना पाठवायचा आहे. यानंतर तुम्ही पाठवलेल्या 100 लोकांनी जर तुमचा रेफरल कोड वापरून नमो अॅपला डोनेशन दिले तर तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळू शकते. तुमची ही संधी हुकली तरी तुम्ही रेफरल कोड पाठवलेल्या 100 लोकांपैकी जर 10 लोकांनी तुमचा रेफरल कोड वापरून जरी डोनेशन दिले तर तुम्हाला एक नमो टी-शर्ट आणि एक कॉफी मग मिळणार आहे. तुम्हाला जर या अॅपविषयी माहिती नसेल तर, तुम्ही हे नमो अॅप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करू शकता.

Web Title: Namo App Will Give Chance To Common People To Meet Pm Modi By Donating 5 Rupees Only