नारदमुनी त्याकाळचे गुगल- मुख्यमंत्री विजय रुपानी

वृत्तसंस्था
सोमवार, 30 एप्रिल 2018

अहमदाबाद- त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांच्या महाभारताच्या वक्तव्यानंतर आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पुराणातील पात्राचा संदर्भ गुगल या सर्च इंजिनशी जोडला आहे. आजच्या काळात जशी गुगलकडे सगळी माहिती असते त्याचप्रमाणे पुराणात नारद यांच्याकडे संपुर्ण जगाची माहिती होती असे वक्तव्य त्यांनी केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित 'देवर्षि नारद जयंती'च्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

रुपानी म्हणाले, नारद यांच्याकडे संपुर्ण जगाची माहिती होती. गुगल हे नारद यांच्याप्रमाणेच माहितीचा स्त्रोत आहे कारण जगभरातील सगळ्या घडामोडींची माहिती तेथे मिळते.

भाजप नेत्यांनी पुराणातील पात्रांची आजच्या काळातील गोष्टींशी तुलना करण्याची ही पहिली घटना नाही. काही दिवसांपुर्वीच त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी 'महाभारत काळात इंटरनेट अस्तित्वात होते आणि त्याकाळातील लोक इंटरनेटचा वापर करत होते,' असा दावा केला होता. 

Web Title: Narad knew all about the world like Google, says Gujarat CM Vijay Rupani