नारायण राणे अमित शहांच्या भेटीला; अटकनाट्यानंतर पहिलीच भेट

नारायण राणे अमित शहांच्या भेटीला; अटकनाट्यानंतर पहिलीच भेट

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे. नारायण राणे यांच्या अटकनाट्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. या भेटीमध्ये त्यांनी राज्यातील परिस्थितीवर चर्चा केली असल्याचं समजतंय. तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर देखील चर्चा केली आहे. मात्र, या भेटीचा नेमका तपशील अद्याप उपलब्ध होऊ शकला नाहीये.

मागील महिन्यात नारायण राणे यांना अटक झाली होती. या अटकेनंतर भाजपला मोठा धक्का बसला होता. नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर हे अटकनाट्य घडलं होतं. त्यानंतर त्यांना कोर्टाकडून जामीन मिळाला होता. त्यानंतर राणेंनी अमित शहा यांच्यासोबत फोनवर बोलणं झालं असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज राणे पहिल्यांदाच शह यांना भेटीसाठी पोहोचले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com