नरेंद्र मोदी विष्णूचे 11 वे अवतार : भाजप प्रवक्ते

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानसेवक आहेत. ते विष्णूचा 11 वा अवतार आहेत, असे भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विटरवर सांगितले. अवधूत वाघ यांच्या या ट्विटनंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

अवधूत वाघ यांनी त्यांच्या टि्वटमध्ये सांगितले, की ''जगाच्या कल्याणासाठी प्रभू रामचंद्राने जन्म घेतला होता. त्याने रामराज्य आणले. नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानसेवक आहेत. ते विष्णूचा 11 वा अवतार आहेत''.  

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले, की "अवधूत वाघ बरेच पक्ष फिरुन आले. त्यामुळे त्यांच्या विधानाकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही''.

Web Title: Narendra Modi is 11th Avatar of Lord Vishu says BJP Spokesperson Avadhut Wagh