अटलजी पंतप्रधानपदी कायम राहिले असते तर...-मोदी

वृत्तसंस्था
शनिवार, 12 जानेवारी 2019

​आधीच्या सरकारमध्ये शौचलये, रेल्वे मार्ग, घरे, वीज-गॅस जोडणींची कामे ज्या वेगाने सुरु होती त्याच वेगाने ही कामे चालली असती तर भरपूर वर्ष लागली असती माझ्या सरकारने ही सर्व कामे वेगाने केली. 10 टक्के आरक्षण हे नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. आधीपासून लागू असलेल्या आरक्षणाशी छेडछाड न करता नवीन आरक्षण दिले. काही जण नव्या आरक्षणावरुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कारस्थान आपल्याला हाणून पाडायचे आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

नवी दिल्ली- 2004च्या निवडणुकीत अटलजी पंतप्रधानपदी कायम राहिले असते तर भारत आणखी उंचीवर गेला असता, असे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले आहे.

आधीच्या सरकारमध्ये शौचलये, रेल्वे मार्ग, घरे, वीज-गॅस जोडणींची कामे ज्या वेगाने सुरु होती त्याच वेगाने ही कामे चालली असती तर भरपूर वर्ष लागली असती माझ्या सरकारने ही सर्व कामे वेगाने केली. 10 टक्के आरक्षण हे नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. आधीपासून लागू असलेल्या आरक्षणाशी छेडछाड न करता नवीन आरक्षण दिले. काही जण नव्या आरक्षणावरुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कारस्थान आपल्याला हाणून पाडायचे आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदी रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते, देश प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालत आहे. भारताला आपले लक्ष्य गाठायचे आहे. दोन खासदार असलेल्या पक्षाचे आज विशाल स्वरुप झाले आहे. देशातील 16 राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. देश प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालत आहे, परंतु यामध्ये विरोधी पक्ष सातत्याने अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाला प्रधानसेवक कसा हवा ते जनतेनेच ठरवायला हवे. रात्र-दिवस मेहनत करणारा की, कधीही सुट्टीवर जाणार प्रधानसेवक हवा ते ठरवावे लागणार.

नॅशनल हेराल्ड प्रकरण 2012 पासून चालू आहे. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे रिमोट कंट्रोल सरकार होते. जमीन, इन्कम टॅक्सची माहिती त्यांना कोणालाही कळू द्यायचे नाही. तपासात सहकार्य केले नाही. हीच तर साम्राज्य आणि संविधानमधली खऱी लढाई आहे. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला हर प्रकारे सतवण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेसने अयोध्या खटल्याची कायदेशीर प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असेही मोदी म्हणाले आहेत.

काँग्रेस विकास कामाच्या प्रक्रियेच्या मार्गात अडथळे आणत असल्याचा आरोपही मोदींनी यावेळी काँग्रेसवर केला. 2014 आधी बँकेकडून कर्ज घेण्याच्या दोन प्रक्रिया होत्या. एक सामान्य प्रक्रिया होती आणि एक होती काँग्रेस प्रक्रिया. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्ज देण्याची काँग्रेसची प्रक्रिया बंद केली गेली असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. देशाला मजबूत सरकार हवे आहे पण विरोधकांना कुटुंब, नातेवाईकांचे भले करण्यासाठी संरक्षण डीलमध्ये दलाली खाण्यासाठी मजबूर सरकार हवे आहे. पण हा चौकीदार थांबणार नाही, आता तर सुरुवात झाली आहे. चोर देशात असो किंवी विदेशात चौकीदार एकालाही सोडणार नसल्याचे मोदींनी सांगितले.

Web Title: Narendra Modi Addressing Rally At Ramlila Maidan