मोदी-अमरिंदरसिंग यांची ‘छुपी’ दोस्ती - सिसोदिया

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शैक्षणिक कामगिरी निर्देशांकावरून (पीजीआय) आम आदमी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले आहे.
Manish Sisodia
Manish SisodiaSakal

नवी दिल्ली - केंद्र सरकारने (Central Government) जाहीर केलेल्या शैक्षणिक कामगिरी निर्देशांकावरून (पीजीआय) (PGI) आम आदमी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाच लक्ष्य (Target) केले आहे. निर्देशांकाच्या यादीत पंजाबला (Punjab) वरचे स्थान आणि दिल्लीला (Delhi) खालचे स्थान दिले आहे. मोदी आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांची ही ‘जुगलबंदी’ आहे, अशा शब्दांत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी टीका केली आहे. (Narendra Modi and Amarinder Singh Hidden Friendship Manish Sisodia)

दिल्लीत शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी केजरीवाल सरकारने मेहनत घेत सरकारी शाळांना दर्जेदार बनविल्याचा दावा या सरकारकडून केला जात आहे. परंतु केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘पीजीआय’मध्ये दिल्लीला अपेक्षित स्थान न मिळाल्याने सरकारकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान मोदी आणि अमरिंदर सिंग यांची ‘छुपी’ दोस्ती असल्याचा आरोप करीत सिसोदिया म्हणाले, ‘‘पंजाबमधील सरकारी शाळांमध्ये ना पायाभूत सुविधा आहेत, अन्य सुविधा आहे. तरीही केंद्र सरकार त्यांना दिल्लीतील शाळांपेक्षा चांगले म्हणत आहे. निवडणुकीच्या आधीचा हा अहवाल पंजाब सरकारला मोदींच्या आशीर्वाद रूपाने मिळाला आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com