मोदी-शहांचा 'प्लॅन सिक्‍स'; सहा राज्यांवर भाजपचे लक्ष

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 जून 2018

नवी दिल्ली : भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने मिशन 2019 ला प्रारंभ करताना 2014 मध्ये भाजपला कमी जागा आलेल्या ईशान्य भारताच्या 'सेव्हन सिस्टर्स'सह केरळ व अन्य सहा राज्यांवर विशेष फोकस ठेवला आहे. 2014 मध्ये मोदींच्या झोळीत भरघोस माप टाकणाऱ्या उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांतील जागा घटण्याची शक्‍यता असल्याने तेथील किमान 50 हून जास्त जागांचा 'संभाव्य खड्डा' या सहा राज्यांतून भरण्याचे मनसुबे भाजपने आखले आहेत. 

गुजरातसह चार राज्यांत 2014 मध्ये भाजपला मिळालेले यश हे 'संपृक्त' स्थितीचे होते. त्याची पुनरावृत्ती करणे अशक्‍य नसले, तरी कठीण असल्याचे भाजपने गृहीत धरले आहे, असे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या राज्यांतील यश कायम ठेवण्याचा निर्धार पक्षाने केला आहे; त्याच वेळी जेथे पक्ष कधीही नव्हता तेथील जागा मोठ्या प्रमाणावर आणण्याचेही लक्ष भाजपने 2019 मध्ये समोर ठेवणे हे स्वाभाविक आहे.

दरम्यान, भाजप सूत्रांच्या मते पश्‍चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांत भाजपने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली व केरळातही डाव्या पक्षांचा हिंदू पार्टी हा शिक्का स्वतःकडे वळवून घेण्यात भाजपला हळूहळू यश येत आहे. दोन्ही राज्यांच्या ग्रामीण भागातील माकप, भाकप व फॉरवर्ड ब्लॉकचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपकडे वळत असल्याचा दावा पक्षनेते करतात. केरळच्या राजकीय समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर तमिळनाडूचे प्रभारी राहिलेले केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळ प्रभारीपदाची सूत्रे येऊ शकतात, असेही सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रात शिवसेना व भाजप यांची युती अद्याप गोंधळलेल्या अवस्थेत असून, भाजपने स्वतंत्रपणे लढण्याची सज्जता ठेवल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातही पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्‍यता पक्षनेतृत्वाने गृहीत धरली आहे. 

या राज्यांवर असेल लक्ष 
2014 च्या मोदी लाटेत भाजपला केवळ चार राज्यांतून 282 पैकी तब्बल 149 जागा मिळाल्या होत्या. तेथे लक्ष केंद्रित करतानाच आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू, ईशान्य भारत, केरळ व ओडिशिा या राज्यांवर-विभागांवर भाजपचे खास लक्ष राहणार आहे. देशभरात जेथे भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता, त्या 181 जागांचाही समावेश यात आहे. यातील केरळमध्ये लोकसभेच्या 20, तमिळनाडू 39, आंध्र 25, तेलंगण 10 ते 12 व पश्‍चिम बंगाल 34 या जागांवर भाजपचा डोळा आहे.

Web Title: Narendra Modi and Amit Shah to focus on Six states for Lok Sabha 2019