पंतप्रधानांच्या ऍपमध्ये 'ऍप-एड'

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

नवी दिल्ली: तज्ज्ञांना, नागरिकांना मत मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऍपमध्ये "ऍप-एड' सेक्‍शन सुरू केला. या माध्यमातून सरकारच्या ध्येयधोरणाबाबत प्रतिक्रिया मांडता येणार आहेत.

नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी मन की बात आणि मायगोव्ह ऍपच्या माध्यमातून लोकांची मते मागवण्यास सुरवात केली आहे. भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांच्या मते, सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत आणि धोरणाबाबत लोकांची थेट मते जाणून घेता येणे यामुळे सोपे होणार आहे. नरेंद्र मोदी ऍपने प्रचंड प्रतिसाद मिळवला असून त्यात तरुणांचा समावेश अधिक आहे.

आजघडीला अँड्रॉईड, आयओएस आणि विंडोजच्या व्यासपीठावरून 80 लाख डाउनलोड झाले आहेत. असंख्य प्रतिक्रिया, सूचना नरेंद्र मोदी ऍपवर येत असून त्यात युवकांची मते अधिक दिसून येत आहेत. लोकांशी संवाद साधण्याचे आणि मते मागवण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ असल्याचेही ते म्हणाले. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, जे. पी. नड्डा, जयंत सिन्हा आणि यूआयडीएआयचे माजी अध्यक्ष नंदन नीलकेणी यांनी प्रतिक्रियांचा बॉक्‍स आपल्या ऍपमध्ये सुरू केला आहे.

Web Title: narendra modi app add