एका चहावाल्याने आई-मुलाला न्यायालयात खेचले : पंतप्रधान

वृत्तसंस्था
बुधवार, 5 डिसेंबर 2018

''मी गरिबी पाहिली आहे. सरकारमध्ये आल्यावर मला विश्वास पटला, की भारत इतक्या वर्षांपर्यंत गरीब कसा झाला. यासाठी फक्त एकच कुटुंब जबाबदार आहे''.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली : आयकरमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार केला. त्यांच्या सरकारने सगळ्या फाईल्स बंद केल्या होत्या. आई-मुलाने (सोनिया-राहुल) जे लिखित स्वरूपात दिले. त्यावर अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर आता एका चहावाल्याने आई-मुलाला न्यायालयात खेचले,  अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) काँग्रेसवर निशाणा साधला.

राजस्थानात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमेरपूर येथे आयोजित जाहीरसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, राजस्थानच्या जनतेने भाजपला विजयी बनविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या निवडणुकीत होणाऱ्या पराभवाचे खापर नामदारावर फोडले जाऊ नये. स्वातंत्र्यानंतर निवडणुका जिंकण्यासाठी जातिवादाचे विष पसरविण्याचे काम कोणी केले. गाव-शहर, श्रीमंत-गरीब असे भेदभाव कोणी केले? ज्या काँग्रेसने 70 वर्षांत सर्व काही नष्ट केले. ते आता तुमचे भले करु शकते का?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.    

तसेच ते पुढे म्हणाले, ''मी गरिबी पाहिली आहे. सरकारमध्ये आल्यावर मला विश्वास पटला, की भारत इतक्या वर्षांपर्यंत गरीब कसा झाला. यासाठी फक्त एकच कुटुंब जबाबदार आहे''.

Web Title: Narendra Modi Attacks Rahul Sonia At Sumerpur Rally