सर्वाधिक फॉलोअर्स असलेले 'राजकीय नेते' मोदी !

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे पदावरून पायउतार होत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका वेगळ्या उंचीवर विराजमान होत आहेत. जगात सोशल नेटवर्किंगवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले 'राजकीय नेते' मोदी बनणार आहेत.

मोदी सोशल नेटवर्किंगचा मोठ्या प्रमाणात वापर करत असून, ते नेहमीच चर्चेत असतात. जगभरात त्यांचे कोट्यावधी चाहते आहेत. सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेले फेसबूक, ट्विटरवर त्यांना फॉलो करणाऱयांची संख्या मोठी आहे.

ओबामांचे ट्विटरवर 8 कोटी 7 लाख 24 हजार 780 फॉलोअर्स आहेत, तर मोदींचे 2 कोटी 64 लाख 80 हजार 518 आहेत. परंतु, ओबामांचा कार्यकाल संपत असल्याने मोदी प्रथम क्रमांकाचे राजकीय नेते बनणार आहेत.

सोशल नेटवर्किंगवर मोदींचे फॉलोअर्स-

  • फेसबुक- 3 कोटी 92 लाख 73 हजार 849.
  • ट्विटर- 2 कोटी 65 लाख.
  • गूगल प्लस- 30 लाख
  • इन्स्टाग्राम- 50 लाखांहून अधिक
  • यूट्यूब- 5 लाखाहूंन अधिक
Web Title: narendra modi to be crowned as most followed leader