राहुल गांधीच्या प्रचाराला 'नरेंद्र मोदी'

राहुल गांधीच्या प्रचाराला 'नरेंद्र मोदी'

रायपूर : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधूमीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चक्क नरेंद्र मोदींसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तीला प्रचारात उतरविले. खरंच राहुल गांधी यांनी याबाबतचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. 

पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत असून, छत्तीसग़डमधील प्रचाराची मुदत संपली आहे. उद्या तेथे मतदान होत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाकडून प्रचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना लडवल्या जात आहेत. यामध्ये राहुल गांधी यांनी छत्तीसगडमध्ये प्रचारा दरम्यान डुप्लिेट नरेंद्र मोदींबरोबरचे फोटो शेअर करत मोदी काँग्रेसचा प्रचार करत असल्याचे म्हटले. या दरम्यान, प्रचार करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीसारखे दिसणाऱ्या व्यक्तीबरोबर फोटो काढून ते सोशल मिडीयावर टाकले आहे. 

राहुल गांधी यांनी हे फोटो फेसबुकवर टाकताना म्हटले आहे की, पहा काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी कोण आले आहे. त्यांना एकप्रकारे असे म्हणायचे आहे की, छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदीही येऊ शकतात. 

दरम्यान, राहुल गांधी हे प्रचारासाठी छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी छत्तीसगडमध्ये 5 हजार कोटी रुपयांचा चिटफंड गैरव्यवहार झाला. त्यादरम्यान अनेक कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र, काही वर्षांनी या कंपन्या गायब झाल्या. या चिटफंड गैरव्यवहारात मुख्यमंत्री रमणसिंह यांचे नाव आले होते. त्यामुळे रमणसिंह यांचे हे भ्रष्ट सरकार आहे. अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सत्ताधारी रमणसिंह सरकारवर टीका केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com