मोदीजी, त्यावेळी अहमदाबाद जळत होते: चिदंबरम

पीटीआय
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मोदी एकीकडे भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन करतात, मात्र त्याच वेळी अहमदाबादमध्ये "पद्मावत'वरून दंगली होत आहेत आणि उत्तर प्रदेशात सार्वजनिक ठिकाणी बसलेल्या सहा जोडप्यांविरोधात नैतिक पोलिसगिरी करणाऱ्यांनी तक्रारी नोंदविल्या आहेत

नवी दिल्ली - दावोसमध्ये मोदी ज्यावेळी गुंतवणूकदारांना आमंत्रण देत होते, त्याचवेळी अहमदाबादमध्ये दंगल सुरु होती आणि उत्तर प्रदेशमध्ये नागरिक "नैतिक पोलिसगिरी'च्या दडपणाखाली वावरत होते, असा टोमणा कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी आज (गुरुवार) मारला.

चिदंबरम यांनी ट्‌वीटरद्वारे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी एकीकडे भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन करतात, मात्र त्याच वेळी अहमदाबादमध्ये "पद्मावत'वरून दंगली होत आहेत आणि उत्तर प्रदेशात सार्वजनिक ठिकाणी बसलेल्या सहा जोडप्यांविरोधात नैतिक पोलिसगिरी करणाऱ्यांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. याच दिवशी डार्विनच्या सिद्धातांवरून प्रकाश जावडेकर त्यांचे सहकारी मंत्री सत्यपाल सिंह यांना कानपिचक्‍या देतात आणि त्याच दिवशी मुस्लिम मुलाशी स्वखुशीने विवाह करणाऱ्या हिंदू मुलीची चौकशी करु नये, अशी तंबी सर्वोच्च न्यायालय देते, असे तिरकस टोले चिदंबरम यांनी मारले आहेत.

Web Title: narendra modi chidambaram congress