‘मोदींचा चीनला इशारा का नाही?’ 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

चीन काश्‍मीरवर लक्ष ठेवून असेल तर हाँगकाँगमधील आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला इशारा का देत नाहीत, अशी विचारणा काँग्रेसने केली आहे.

नवी दिल्ली - चीन काश्‍मीरवर लक्ष ठेवून असेल तर हाँगकाँगमधील आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला इशारा का देत नाहीत, अशी विचारणा काँग्रेसने केली आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी ट्विट करून सरकारला विचारणा केली. ‘चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग म्हणतात, की काश्‍मीवर आमचे लक्ष आहे, तर मग हाँगकाँगमधील निदर्शनांवर, जिझियांग प्रांतात होणाऱ्या मानवाधिकारांच्या उल्लंघनावर, तिबेटमध्ये सुरू असलेल्या दडपशाहीवर, तसेच दक्षिण चीन समुद्रातील घडामोडींवर भारताचेही लक्ष आहे, असे नरेंद्र मोदी, का म्हणत नाहीत,’ अशा शब्दांत तिवारी यांनी सरकारला लक्ष्य केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi Chin Warning Congress