कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच देश नरेंद्र मोदींचा हल्लाबोल; विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल 

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

नरेंद्र मोदींचा "रोड शो' 
दिल्ली-मेरठ एक्‍स्प्रेस वेच्या उद्‌घाटनापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादरीकरणाद्वारे एक्‍स्प्रेस वेची पूर्ण माहिती दिली. त्यानंतर मोदींनी सुमारे 6 किलोमीटर रोड शोही केला. रोड शो सुरू करण्यापूर्वी मोदी गाडीत उभे राहून पुढे जाऊ लागले, त्या वेळी अचानक त्यांनी गाडी थांबविण्यास सांगितले आणि गडकरींना गाडीत घेण्याची सूचना केली. त्यानंतर गडकरींसमवेत मोदींनी रोड शो केला. या वेळी रस्त्यावर दोन्ही बाजूला लोकांनी मोठी गर्दी केली होती. मोदींनीही हात उंचावून लोकांना अभिवादन केले

बागपत - कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक देश आहे. पण माझ्यासाठी देशच एक कुटुंब आहे. काही लोक पायाखालची जमीन सरकल्याचे पाहून विरोधक अफवा पसरवित आहेत. आरक्षणाबरोबरच आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरही खोटे बोलत आहेत. देशातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केला. 

मोदी यांच्या हस्ते आज दिल्ली-मेरठ एक्‍स्प्रेस वेचे उद्‌घाटन झाले. त्यानंतर येथे झालेल्या सभेत त्यांनी सरकारचे चार वर्षांचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर सादर केले. त्याचवेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. पिढ्यान्‌ पिढ्या एकाच घराण्यात सत्ता पाहणारे, त्या घराण्याला पुजणारे गरिबांसाठी केल्या जाणाऱ्या विकासाची खिल्ली उडवत असल्याची टीका त्यांनी केली. ते म्हणाले, "एनडीए' सरकारचे काम पाहून काही लोक संतापले आहेत. कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशातील मीडियाही त्यांना पक्षपाती वाटत आहे. सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या जवानांचे शौर्यही त्यांनी नाकारले आहे. देशाचे कौतुक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांचीही खिल्ली उडवत आहेत. कॉंग्रेस त्रस्त होण्याचे कारण सगळ्यांनाच ठाऊक आहे. मोदींच्या विरोधासाठी ते देशालाही विरोध करत आहेत. ज्यांच्यावर सव्वाशे कोटी जनतेचा विश्वास आहे, ते कोणत्याही आरोपांनी डगमगणार नाहीत. 

दिल्ली-मेरठ महामार्ग 
11000 कोटी : महामार्गाचा खर्च 
135 किलोमीटर : महामार्गाची लांबी 
500 दिवस : महामार्गाचे काम पूर्ण 

नरेंद्र मोदींचा "रोड शो' 
दिल्ली-मेरठ एक्‍स्प्रेस वेच्या उद्‌घाटनापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादरीकरणाद्वारे एक्‍स्प्रेस वेची पूर्ण माहिती दिली. त्यानंतर मोदींनी सुमारे 6 किलोमीटर रोड शोही केला. रोड शो सुरू करण्यापूर्वी मोदी गाडीत उभे राहून पुढे जाऊ लागले, त्या वेळी अचानक त्यांनी गाडी थांबविण्यास सांगितले आणि गडकरींना गाडीत घेण्याची सूचना केली. त्यानंतर गडकरींसमवेत मोदींनी रोड शो केला. या वेळी रस्त्यावर दोन्ही बाजूला लोकांनी मोठी गर्दी केली होती. मोदींनीही हात उंचावून लोकांना अभिवादन केले

Web Title: narendra modi criticise on congress in baghpat