वर जाऊन बाळासाहेबांना उत्तर द्यायचंय- मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - नोटबंदीचा निर्णय मी मागे घेणार नाही. मला वर जाऊन बाळासाहेबांना उत्तर द्यायचे आहे, असा टोमणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या खासदारांना लगाविला.

नोटबंदीच्या निर्णयावरून शिवसेनेच्या 13 खासदारांनी आज (मंगळवार) पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या बैठकीनंतर शिवसेनेने आपली मोर्चात सहभागी होण्याची भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. नोटबंदीवरून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडून सतत मोदींवर टीका करण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या खासदारांना मोदी म्हणाले, की नोटबंदीच्या निर्णयावर मी ठाम आहे. हा निर्णय मी मागे घेणार नाही. मला माहिती नाही तुमची भूमिका काय असेल. पण, मला वर जाऊन बाळासाहेबांना उत्तर द्यायचे आहे. मी चांगले काम केले आहे. तुमचा या निर्णयाला विरोध असला तरी तुम्हाला आमच्यासोबत यायच आहे.

Web Title: Narendra Modi criticize Shiv Sena MPs on Demonitisation issue