विरोधकांनी तारतम्य बाळगावे : मोदी 

विरोधकांनी तारतम्य बाळगावे : मोदी 

जामनगर (पीटीआय) : 'राफेल'बाबतच्या विधानावर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज फटकारले. विरोधकांनी आरोप करताना तारतम्य बाळगावे, असा टोला मोदींनी मारला. 

येथील एका कार्यक्रमात मोदींनी विरोधकांवर टीका केली. 'राफेल विमानांची खरेदी योग्य वेळी झाली असती तर हवाई युद्धात त्याचा बराच परिणाम दिसून आला असता, असे मी म्हणालो होतो. मात्र, मी हवाई दलाच्या क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्याची टीका विरोधक करत आहेत. विरोधकांनी जरा तारतम्य बाळगावे. राफेल असते तर आपले एकही विमान पडले नसते आणि त्यांचे एकही वाचले नसते, असा माझ्या म्हणण्याचा अर्थ होता,'' असे मोदी यांनी स्पष्ट केले. हवाई हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या विरोधकांना मला हटवायचे आहे, तर मला दहशतवाद मिटवायचा आहे, असा दावाही त्यांनी केला. दहशतवादाच्या रोगाची मुळे शेजारील देशात आहेत, हा रोग मुळापासून नष्ट करायला हवा की नको? या रोगाची मुळे दुसऱ्या देशात असली तरी आपण शांत बसणार नाही, असे मोदी यांनी स्पष्ट केले. 

कराची नव्हे, कोची 
भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांचा पाकिस्तानातील कराची आणि केरळमधील कोची या शहरांदरम्यान घोळ झाला. आयुष्मान भारत योजनेबद्दल बोलताना ते म्हणाले, की या योजनेमुळे कोलकता ते कराचीपर्यंतच्या सर्वांना उपचार मिळतील. मात्र, ही चूक त्याचक्षणी मोदींच्याच लक्षात आली आणि त्यांनी तातडीने कराची नव्हे, कोची असे स्पष्ट केले. सध्या माझ्या डोक्‍यात शेजारील देशाचेच विचार सुरू असल्याने हा गोंधळ उडाला, असे ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com