लंडन झाले की नाही बघायला आलोय : मोदी

Narendra Modi Criticizes Telangana Caretaker CM Chandrashekhar Rao
Narendra Modi Criticizes Telangana Caretaker CM Chandrashekhar Rao

नवी दिल्ली : चंद्रशेखर राव यांची मुख्यमंत्री होण्यापूर्वी निझामाबादला लंडनसारखे करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी दिलेले आश्वासन अद्याप पाळले नाही. त्यांनी केलेले लंडन झाले की नाही हे बघायला मी इथं आलोय. निझामाबदचे लंडन अद्याप का झाले नाही? त्यामुळे आता चंद्रशेखर राव यांनी लंडनला जावे आणि तेथे पाच वर्षे राहावे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाचे काळजीवाहू मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधला. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, ''चंद्रशेखर राव यांनी निवडणुकीपूर्वी निझामाबादचे स्मार्ट सिटीत रुपांतर करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, राज्यात असे काहीही झालेले नाही. राज्यातील जनता अजूनही मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी झटत आहे''. तसेच ते पुढे म्हणाले, ''मी माझ्या हेलिकॉप्टरच्या पायलटला सांगितले, की निझामाबाद शहराचे सर्वेक्षण करून शहरात जो विकास झाला. त्याची पाहणी करायची आहे. त्यानुसार मी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून झालेल्या विकासाची पाहणी केली. मात्र, जेव्हा ही पाहणी केली. तेव्हा मला कोणताही विकास झाला नसल्याचे दिसले. तसेच गरीब शहरांतील विकास निझामाबादपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांसाठी लंडनला जावे आणि त्यानंतर भारतात परत यावे''. 

दरम्यान, यापूर्वी चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री बनवण्यापूर्वी राज्यातील प्रत्येक घरांत गोदावरीतून सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगितले होते. मात्र, त्यांनी दिलेले हे आश्वासनदेखील पाळले नसल्याचे पंतप्रधान म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com