'डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नरेंद्र मोदी हे ब्राह्मणच'

वृत्तसंस्था
सोमवार, 30 एप्रिल 2018

त्रिवेदी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आडनावामुळे ब्राह्मण होते. त्यांना हे आडनाव त्यांच्या ब्राह्मण गुरुने दिले होते. बुद्धिमान असलेली प्रत्येक व्यक्ती ब्राह्मण असते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ब्राह्मण आहेत.

गांधीनगर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राह्मण आहेत असे वादग्रस्त वक्तव्य गुजरात विधानसभेचे सभापती राजेंद्र त्रिवेदी यांनी केले आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित 'मेगा ब्राह्मण बिजनेस सिमट' दरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल हे देखील उपस्थित होते.

त्रिवेदी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आडनावामुळे ब्राह्मण होते. त्यांना हे आडनाव त्यांच्या ब्राह्मण गुरुने दिले होते. बुद्धिमान असलेली प्रत्येक व्यक्ती ब्राह्मण असते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ब्राह्मण आहेत.

ब्राह्मणांनीच देव निर्माण केले
राजेंद्र त्रिवेदी म्हणाले, ब्राह्मणांनीच देव निर्माण केले आहेत. प्रभु राम क्षत्रिय होते परंतू ऋषी-मुनींनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन त्यांना देव बनवले. तसेच व्यास हे सुद्दा एका मत्स्यकन्येचे पुत्र होते त्यांनादेखील ब्राह्मणांमुळे देवत्व मिळाले. भगवान श्रीकृष्ण हे त्याकाळातील ओबीसी होते त्यांना सान्दिपनि ऋषींनी देव बनवले.

ब्राह्मण सत्तेसाठी भुकेले नसतात 
ब्राह्मणांनी सत्तेचा मोह केला नाही हे सांगताना त्रिवेदी म्हणाले, चाणाक्याने चंद्रगुप्त मौर्याला राजा बनवलं, ते स्वतः सुद्धा राजा बनु शकले असते परंतु बुद्धीमान असुनही ब्राह्मणांनी कधीच सत्तेचा मोह केला नाही. ते नेहमी समाजाचा विचार करतात.

Web Title: narendra modi dr babasaheb ambedkar are brahmin says gujarat assembly speaker