भगवान शंकर मला बोलले तू खूप बोलतोस : नरेंद्र मोदी

Narendra Modi
Narendra Modi

वाराणसीः 2014 च्या निवडणुकीत मी बोललो होतो की मी येथे आलेलो नाही, तर मला बोलावण्यात आले आहे. कदाचित, मला भगवान शंकरानेच सांगितले असावे की, तू बोलतोस खूप पण जरा इकडे येऊन काम करुन दाखवं. भगवान शंकराच्या आशिर्वादाने माझे स्वप्न आज पूर्ण झाले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदी आज (शुक्रवार) उत्तर प्रदेशातील वाराणसी, कानपूर व गाझीयाबाद या तीन शहरांच्या दौऱ्यावर आहेत. वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर काशी विश्वनाथ कॉरिडोरचं भुमीपूजन केले. या कामासाठी 600 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईक उपस्थित होते.

मोदी म्हणाले, 'राजकारणात येण्यापूर्वीच मी काशीला आलो होतो. मला तेंव्हापासून मंदिरासाठी काहीतरी केले पाहिजे असे वाटत होते. आज भगवान शंकराच्या आशिर्वादाने माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. गंगा नदीला थेट भगवान शंकराशी आता जोडले आहे. यामुळे भक्त गंगास्नान केल्यानंतर थेट भगवान शंकराच्या दर्शनासाठी येऊ शकतात. चारही बाजूंनी भिंतींनी घेरलेल्या भगवान शंकराच्या मुक्ततेची ही सुरुवात आहे. यासाठी मी योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारचे आभार मानतो. त्यांनी यामध्ये खूप सहकार्य केले आहे. तीन वर्ष आधी मला तत्कालीन सरकारची साथ मिळाली असती तर आज मी कदाचित उद्घाटन करताना दिसलो असतो.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com