नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या भेटीसाठी रवाना

शनिवार, 25 मे 2019

- सत्ता स्थापनेचा करणार दावा.

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर आता मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. यादरम्यान ते राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत.

संसद भवन येथे मोदींची नेतेपदी निवडीची घोषणा काही मिनिटांपूर्वी करण्यात आली. त्यानंतर आता सरकार स्थापन करण्यासंदर्भात वेगवान हालचाली घडत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला 303 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी लागणारी 'मॅजिक फिगर' भाजपने गाठली आहे. त्यानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या भेटीसाठी निघाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi leaves for Meet President Ramnath Kovind