'मी नरेंद्र मोदींची पत्नी, ते माझे राम'

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

आनंदीबेनसारख्या एका सुशिक्षित महिलेने एका शिक्षिकेबाबत असे बोलणे अशोभनीय आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारताचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. नरेंद्र मोदी हे माझ्यासाठी सन्माननीय आहेत, असेही जशोदाबेन यांनी म्हटले आहे.

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे लग्न झाले आहे आणि ते माझ्यासाठी राम आहेत. एका सुशिक्षित महिलेकडून (आनंदीबेन) एका शिक्षेकेबाबत असे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे, असे सांगणारा जशोदाबेन यांचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे.

मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी नरेंद्र मोदी हे अविवाहित असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर जशोदाबेन यांनी आपले म्हणणे स्पष्ट केले आहे. आनंदीबेन यांनी केलेल्या वक्तव्याबाबत जशोदाबेन यांनी आश्चर्य व्यक्त केले.

जशोदाबेन म्हणाल्या, ''आनंदीबेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अविवाहित असल्याचा दावा केल्याने मला धक्का बसला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अर्ज भरताना मोदींनी स्वत: विवाहित असल्याचे शपथपत्र देत पत्नीच्या नावाच्या जागी माझे नाव लिहिले होते. जशोदाबेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राहत नसले तरी त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर आहे. माझे त्यांच्याशी लग्न झाले असून, ते माझ्यासाठी राम आहेत.''

आनंदीबेनसारख्या एका सुशिक्षित महिलेने एका शिक्षिकेबाबत असे बोलणे अशोभनीय आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारताचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. नरेंद्र मोदी हे माझ्यासाठी सन्माननीय आहेत, असेही जशोदाबेन यांनी म्हटले आहे.

आनंदीबेन पटेल यांचे वक्तव्य जेव्हा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले तेव्हा आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी या वक्तव्याचे वृत्त जेव्हा वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले तेव्हा आम्ही याचा उत्तर देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जशोदाबेन यांची प्रतिक्रिया मोबाइलवर रेकॉर्ड करून आम्ही प्रसारित केली, असे त्यांचा भाऊ अशोक मोदी यांनी म्हटले आहे.

Web Title: Narendra Modi married me and he is ram for me says Jashodaben