पंतप्रधान मोदींनाही वाराणसीत हरवू: राहुल गांधी 

वृत्तसंस्था
रविवार, 8 एप्रिल 2018

भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधकांच्या एकजुटीवर राहुल यांनी या वेळी विश्‍वास व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या दलित आंदोलनाबाबत विचारले असता राहुल यांनी, आगामी निवडणूक भाजप जिंकेल असे मला वाटत नाही, त्यामुळे पुढील वर्षीपासून पुन्हा पहिल्यासारखे सुरळीत होईल, असे सांगितले. 

बंगळूर : विरोधी पक्षांच्या एकत्रित ताकदीमुळे 2019 ची सार्वत्रिक निवडणूक भाजपने जिंकणे तर सोडाच, मोदीही त्यांच्या वाराणसी मतदारसंघातून पराभूत होतील, असा दावा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला.

भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधकांच्या एकजुटीवर राहुल यांनी या वेळी विश्‍वास व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या दलित आंदोलनाबाबत विचारले असता राहुल यांनी, आगामी निवडणूक भाजप जिंकेल असे मला वाटत नाही, त्यामुळे पुढील वर्षीपासून पुन्हा पहिल्यासारखे सुरळीत होईल, असे सांगितले. 

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांचा जोर शिगेला पोचला असून, बंगळूरमध्ये आज राहुल गांधी यांनी जोरदार प्रचार केला. बंगळूर शहरात 28 विधानसभा मतदारसंघ असल्याने काँग्रेसने याठिकाणी जोर लावला आहे. राहुल गांधी यांनी मेट्रोने प्रवास करत प्रवाशांसोबत सेल्फीही काढला. 

Web Title: Narendra Modi may lose Varanasi in 2019 says Rahul Gandhi