नरेंद्र मोदींनी केला सत्ता स्थापनेचा दावा

नरेंद्र मोदींनी केला सत्ता स्थापनेचा दावा

नवी दिल्ली : भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए-2 सरकारचा शपथविधी येत्या 30 मे रोजी होणार आहे.

नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर काही मिनिटांतच मोदींनी राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपला 303 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी लागणारी 'मॅजिक फिगर' भाजपने गाठली आहे. त्यानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com