फेसबुकच्या सर्वेक्षणात जगभरातून मोदींना सर्वाधिक 'लाईक'

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 मे 2018

सर्वाधिक 'इंटरॅक्शन' (संवाद) असलेले मोदी हे या सर्वेक्षणानुसार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच मोदींचे अधिकृत फेसबुक पेज - 'प्राईम मिनीस्टर ऑफिस' (पीएमओ) हे फेसबुकवरील युजर्सच्या आवडीनुसार चौथ्या क्रमांकावर आहे. 

नवी दिल्ली : फेसबुकच्या सर्वेक्षणानुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेसबुकवरील सर्वात आवडते पंतप्रधान असल्याचे समोर आले आहे. त्याबरोबरच सर्वाधिक 'इंटरॅक्शन' (संवाद) असलेले मोदी हे या सर्वेक्षणानुसार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच मोदींचे अधिकृत फेसबुक पेज - 'प्राईम मिनीस्टर ऑफिस' (पीएमओ) हे फेसबुकवरील युजर्सच्या आवडीनुसार चौथ्या क्रमांकावर आहे. 

'वर्ल्ड लिडर्स ऑन फेसबुक' या सर्वेक्षणावर बर्सन कोहन व वॉल्फ यांनी काम केले. हे सर्वेक्षण प्रथम ट्विटरने त्यांच्या 'ट्विप्लोमसी' या अधिकृत हँडलवरून जगासमोर आणले. त्यामुळे फेसबुकवर अजूनही मोदींना पसंती मिळत आहे, हे स्पष्ट झाले आहे.

जगातील सर्वाधिक आवडते पंतप्रधान -
या विभागात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेसबुकवरील जगभरातून सर्वाधिक आवडते पंतप्रधान आहेत. त्यांना 43.2 दशलक्ष इतकी पसंती आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 23.1 दशलक्ष इतकी पसंती आहे. तिसऱ्या क्रमांकावर जॉर्डनची राणी रायना या आहेत. याशिवाय तुर्की, इंडोनेशिया, इजिप्त या देशांचे अध्यक्ष आहेत. 

सर्वाधिक 'इंटरॅक्शन' (संवाद) -
सर्वाधिक इंटरॅक्शन म्हणजेच सर्वाधिक संवाद साधलेल्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या स्थानावर आहेत. यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथम स्थानावर बाजी मारली आहे. 

पंतप्रधानांचे अधिकृत फेसबुक पेजही या सर्वेक्षणात चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे फेसबुकच्या युजर्समध्ये मोदी लोकप्रिय असल्याचे या सर्वेक्षणातून समोर येत आहे.

Web Title: narendra modi most liked in the world in facebook survey