...म्हणून मोदी छायाचित्र काढत नाहीत- इराणी

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

'भारतात एक वेळ अशी परिस्थिती होती की पंतप्रधान दिसत होते परंतु कोणी ऐकू शकत नव्हते. ते हुषार होते परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेत हुषारी दिसली नाही. यानंतर एक गरीब कुटुंबातील मुलगा, चहा विक्रेता प्रथमच संसेदत आला. अन् त्यांनी सेवक असल्याचे सांगितले.

- स्मृती इराणी

बस्ती (उत्तर प्रदेश)- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीब कुटुंबातील असल्यामुळे गरीब नागरिकाच्या घरी जाऊन खातानाचे छायाचित्र काढत नाहीत. कारण त्यांनी गरिबी पाहिली आहे, असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.

एका कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर इराणी यांनी टीका केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, 'भारतात एक वेळ अशी परिस्थिती होती की पंतप्रधान दिसत होते परंतु कोणी ऐकू शकत नव्हते. ते हुषार होते परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेत हुषारी दिसली नाही. यानंतर एक गरीब कुटुंबातील मुलगा, चहा विक्रेता प्रथमच संसेदत आला. अन् त्यांनी सेवक असल्याचे सांगितले.'

'सन 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाने मोदींना देशासमोर उभे केले त्यावेळी काँग्रेस, समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाने त्यांची खिल्ली उडविली. परंतु, याच पंतप्रधानाने गरिबांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. बॅंकेत जन-धन योजनेखाली खाती उघडली आहेत,' असेही इराणी म्हणाल्या.

Web Title: narendra modi never shoot photo- irani