'मोदींनी देशात लावली अघोषित आर्थिक आणीबाणी'

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेऊन देशात अघोषित आर्थिक आणीबाणी लागू केल्याची जोरदार टीका बहुजन समाज पक्षाच्या (बसप) नेत्या मायावती यांनी केली आहे.

काळा पैसा आणि अवैध व्यवहार रोखण्यासाठी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा मंगळवार मध्यरात्रीपासून चलनातून बंद करण्यात आल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. एक हजाराच्या नोटा चलनातून पूर्णपणे बंद होणार असून, पाचशे रुपयांच्या आणि दोन हजारांच्या नव्या नोटा चलनात येणार आहेत. मोदींच्या या निर्णयावर आज (गुरुवार) मायावतींनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

मायावती म्हणाल्या, की मोदीं सरकारच्या अडीच वर्षांच्या अपयशाला झाकण्यासाठी त्यांनी देशात आर्थिक आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण केली आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय यासासाठीच आहे. देशातील 90 टक्के नागरिक केंद्राच्या या निर्णयामुळे चिंतेत आहे. सरकारच्या कोणत्याच योजनांवर स्पष्टीकरण नाही. मोदींच्या या निर्णयामुळे देशातील गरिब, शेतकरी आणि मजूर त्रस्त आहेत. या निर्णयाने अनेक देशातील दुकाने बंद आहेत.

Web Title: narendra modi put country on undeclared financial emergency mayawati