असे आहे नवे मंत्रिमंडळ आणि त्यांच्याकडील खाती

असे आहे नवे मंत्रिमंडळ आणि त्यांच्याकडील खाती

नवी दिल्ली - होणार होणार म्हणून गेले अनेक महिने चर्चेत असणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार झाला. या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची ओळख व खाती पुढीलप्रमाणे -

  • नरेंद्र मोदी, पंतप्रधान, कार्मिक, तक्रार निवारण आणि निवृत्तिवेतन, अंतराळ, अणुऊर्जा विभाग, धोरणात्मक विषय अन्य वाटप न झालेली खाती

कॅबिनेट मंत्री -

  • राजनाथसिंह, गृह
  • सुषमा स्वराज, परराष्ट्र व्यवहार
  • अरुण जेटली, अर्थ आणि कंपनी व्यवहार
  • एम. वेंकय्या नायडू, शहर विकास, गृहनिर्माण आणि शहरी दारिद्य्र निर्मूलन, माहिती व प्रसारण
  • नितीन गडकरी, रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी
  • मनोहर पर्रीकर, संरक्षण
  • सुरेश प्रभू, रेल्वे
  • डी. व्ही. सदानंद गौडा, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी
  • उमा भारती, जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान
  • नजमा हेपतुल्ला, अल्पसंख्याक व्यवहार
  • रामविलास पासवान, ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण
  • कलराज मिश्र, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग
  • मेनका गांधी, महिला आणि बालकल्याण
  • अनंतकुमार, रसायन आणि खते, संसदीय कामकाज
  • रविशंकर प्रसाद, कायदा व न्याय, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान
  • जगतप्रकाश नड्डा, आरोग्य आणि कुटुंबकल्याण
  • अशोक गजपती राजू पुसपती, नागरी हवाई वाहतूक
  • अनंत गिते, अवजड आणि सार्वजनिक उद्योग
  • हरसिमरत कौर बादल, अन्नप्रक्रिया उद्योग
  • नरेंद्रसिंह तोमर, ग्रामविकास व पंजायतराज, पेयजल आणि सार्वजनिक स्वच्छता
  • चौधरी वीरेंद्रसिंह, पोलाद
  • ज्युएल ओराम, आदिवासी विकास
  • राधामोहनसिंह, कृषी आणि शेतकरी कल्याण
  • थावरचंद गेहलोत, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
  • स्मृती इराणी, वस्रोद्योग
  • हर्षवर्धन, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान
  • प्रकाश जावडेकर, मनुष्यबळ विकास

राज्यमंत्री -

  • राव इंद्रजितसिंह, नियोजन (स्वतंत्र कार्यभार) नगरविकास, गृहनिर्माण आणि नागरी दारिद्य्र निर्मूलन
  • बंडारू दत्तात्रेय, कामगार आणि रोजगार (स्वतंत्र कार्यभार)
  • राजीवप्रताप रूडी, कौशल्य विकास आणि उद्यमशीलता (स्वतंत्र कार्यभार)
  • विजय गोयल, युवक आणि क्रीडा (स्वतंत्र कार्यभार), जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान
  • श्रीपाद नाईक, आयुष (स्वतंत्र कार्यभार)
  • धर्मेंद्र प्रधान, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू (स्वतंत्र कार्यभार)
  • पीयूष गोयल, ऊर्जा, कोळसा, अपारंपरिक ऊर्जा, खाण (स्वतंत्र कार्यभार)
  • जितेंद्रसिंह, ईशान्य भारत विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तिवेतन, अणुऊर्जा आणि अवकाश संशोधन
  • निर्मला सीतारामन, वाणिज्य आणि उद्योग (स्वतंत्र कार्यभार)
  • महेश शर्मा, सांस्कृतिक व पर्यटन (स्वतंत्र कार्यभार)
  • मनोज सिन्हा, दळणवळण (स्वतंत्र कार्यभार), रेल्वे
  • अनिल माधव दवे, पर्यावरण, वने आणि वातावरण बदल (स्वतंत्र कार्यभार)
  • व्ही. के. सिंह, परराष्ट्र व्यवहार
  • संतोषकुमार गंगवार, अर्थ
  • फग्गनसिंह कुलस्ते, आरोग्य आणि कुटुंबकल्याण
  • मुख्तार अब्बास नक्वी, अल्पसंख्याक व्यवहार, संसदीय कामकाज
  • एस. एस. अहलुवालिया, कृषी, शेतकरी कल्याण आणि संसदीय कामकाज
  • रामदास आठवले, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
  • रामकृपाल यादव, ग्रामीण विकास
  • हरिभाई पार्थीभाई चौधरी, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग
  • गिरिराज सिंह, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग
  • हंसराज अहीर, गृह
  • जी. एम. सिद्धेश्‍वर, अवजड व सार्वजनिक उद्योग
  • रमेश चंदाप्पा जिगजिनगी, पेयजल आणि सार्वजनिक स्वच्छता
  • राजन गोहेन, रेल्वे
  • परषोत्तम रूपाला, कृषी आणि शेतकरी कल्याण, पंचायतराज
  • एम. जे. अकबर, परराष्ट्र व्यवहार
  • उपेंद्र कुशवाह, मनुष्यबळ विकास
  • राधाकृष्णन. पी, रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी
  • किरन रिज्जू, गृह
  • क्रिशन पाल, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
  • जसवंतसिंह सुमनभाई भाभोर, आदिवासी विकास
  • संजीवकुमार बलियान, जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान
  • विष्णुदेव साई, पोलाद
  • सुदर्शन भगत, कृषी आणि शेतकरी कल्याण
  • वाय. एस. चौधरी, विज्ञान, तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान
  • जयंत सिन्हा, नागरी हवाई वाहतूक
  • कर्नल राजवर्धनसिंह राठोड, माहिती आणि प्रसारण
  • बाबुल सुप्रियो, नगरविकास, गृहनिर्माण आणि नागरी दारिद्य्र निर्मूलन
  • निरंजन ज्योती, अन्नप्रक्रिया उद्योग
  • विजय सांपला, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
  • अर्जुनराम मेघवाल, अर्थ, कंपनी व्यवहार
  • डॉ. महेंद्रनाथ पांडे, मनुष्यबळ विकास
  • अजय टामटा, वस्रोद्योग
  • श्रीमती कृष्णा राज, महिला आणि बालकल्याण
  • मनसुख मांडविया, रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजनिर्मिती, रसायने व खते
  • अनुप्रियासिंह पटेल, आरोग्य आणि कुटुंबकल्याण
  • सी. आर. चौधरी, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण
  • पी. पी. चौधरी, कायदा आणि न्याय, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, माहिती तंत्रज्ञान
  • सुभाष भामरे, संरक्षण


मोदींच्या मंत्रिमंडळातील नवे चेहरे 

प्रकाश जावडेकर (राज्यसभा खासदार) 
जन्म - 30 जानेवारी 1951 
- वन मंत्रालयाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली 
- हवामान बदलांसंदर्भातील पॅरिसमधील चर्चेत महत्त्वाचे योगदान 
- दहा वर्षांपासून वन मंत्रालयात रखडलेल्या दोन हजार प्रकल्पांना मंजुरी दिली 
-------------------------------------  
डॉ. सुभाष भामरे (धुळ्याचे खासदार) 
जन्म - 11 सप्टेंबर 1953 
- भाजपचे खानदेशातील मराठा समाजातील मोठे नेते 
- एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर या भागातील सत्ता-समीकरण सांभाळण्यासाठी मंत्रिपद 
- लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे मोठे नेते अमरीश पटेल यांचा पराभव केला 
-------------------------------------  
रामदास आठवले (राज्यसभा खासदार) 
जन्म - 25 डिसेंबर 1959 
- महाराष्ट्रातील मोठ्या दलित नेत्यांपैकी एक 
- 2011मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सोडून महायुतीमध्ये सहभागी झाले 
- लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिल्याबद्दल मंत्रिपदाचे बक्षीस 
-------------------------------------  
एस. एस. अहलुवालिया (दार्जिलिंगचे खासदार) 
जन्म - 4 जुलै 1951 
- सर्व पक्षांतील नेत्यांशी मैत्रीचे संबंध 
- अनेक महत्त्वाच्या विधेयकावर संशोधन करणारे भाजपचे "रिसर्च स्कॉलर‘ 
- स्वत-ची मते बिनधास्तपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध 
-------------------------------------  
एम. जे. अकबर (राज्यसभा खासदार) 
जन्म - 11 जानेवारी 1951 
- संपादक, लेखक आणि देशातील वरिष्ठ पत्रकार 
- कधीकाळी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे निकटवर्तीय 
- भाजपमधील आधुनिक मुस्लिम चेहरा; मोदींचे खंबीर पाठीराखे 
-------------------------------------  
रमेश जिगजिणगी (विजापूरचे खासदार) 
जन्म - 28 जून 1952 
- भाजपमधील दलित नेते 
- पाच वेळा लोकसभेवर निवड 
- कर्नाटकमधील पक्षाचे महत्त्वाचे नेते 
-------------------------------------  
पुरुषोत्तम रूपाला (राज्यसभा खासदार) 
जन्म - 1 ऑक्‍टोबर 1954 
- गुजरातमधील कडवा पटेल समाजातील वजनदार नेते 
- पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय 
- गुजरातचे कृषिमंत्री म्हणून काम 
-------------------------------------  
अनिल माधव दवे (राज्यसभा खासदार) 
जन्म - 
- मध्य प्रदेशातील भाजपचे रणनीतीकार 
- पर्यावरणवादी आणि नद्यांसंदर्भात काम 
- पर्यावरणविषयक अनेक पुस्तकांचे लेखन 
-------------------------------------  
अर्जुन राम मेघवाल (बिकानेरचे खासदार) 
ज्न्म - 7 डिसेंबर 1954 
- सरकारी वाहन न वापरता सायकलवर लोकसभेत येणारे खासदार 
- राजस्थान "केडर‘चे माजी "आएएस‘ अधिकारी 
- हिंदीसह स्थानिक भाषांच्या वापराबद्दल आग्रही 
-------------------------------------  
विजय गोयल (राज्यसभा खासदार) 
जन्म - 4 जानेवारी 1954 
- दिल्लीतील विधानसभा निवडणुकीवेळी पंख छाटण्यात आले होते 
- कौशल्यपूर्ण आणि माध्यमांशी चांगले संबंध असलेले दिल्लीतील नेते 
- केजरीवाल यांना रोखण्यासाठी गोयल यांना बळ देण्यात आल्याची शक्‍यता 
-------------------------------------  
राजन गोहेन (नवगावचे खासदार) 
जन्म - 26 नोव्हेंबर 1950 
- चहाच्या मळ्यांसदर्भात विविध प्रश्नांवर आंदोलने 
- आसामातील अहोम या महत्त्वाच्या समाजातील नेते 
- आसामात भाजपच्या विस्तारासाठी मदत 
-------------------------------------  
महेंद्रनाथ पांड्ये (चंदौलीचे खासदार) 
जन्म - 15 ऑक्‍टोबर 1957 
- उत्तर प्रदेशातील भाजपचा ब्राह्मण चेहरा 
- आगामी विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न 
- पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे निकटवर्तीय 
-------------------------------------  
छोटू राम चौधरी (नागौरचे खासदार) 
जन्म - 1 मार्च 1948 
- राजस्थानातील जाट समाजाचे वरिष्ठ नेते 
- माजी प्रशासकीय अधिकारी, बर्मिंगहॅम विद्यापीठातून पदवीचे शिक्षण 
- ग्रामीण विकास या विषयात विशेष रुची 
-------------------------------------  
पी. पी. चौधरी (पालीचे खासदार) 
जन्म - 12 जुलै 1953 
- वरिष्ठ वकील, लोकसभेतील उपस्थितीबाबत कौतुक 
- राजस्थानातील इतर मागासवर्गीय समाजाचे नेते 
- वयाच्या आठव्या वर्षापासून संघाचे कार्यकर्ते
-------------------------------------
डॉ. सुभाष भामरे (धुळ्याचे खासदार) 
जन्म - 11 सप्टेंबर 1953 
शिक्षण - एम. एस. 
- भाजपचे खानदेशातील मराठा समाजातील मोठे नेते 
- एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर या भागातील सत्ता-समीकरण सांभाळण्यासाठी मंत्रिपद 
- लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे मोठे नेते अमरीश पटेल यांचा पराभव केला 
-------------------------------------  
रामदास आठवले (राज्यसभा खासदार) 
जन्म - 25 डिसेंबर 1959 
शिक्षण - अंडर ग्रॅज्यूएट 
- महाराष्ट्रातील मोठ्या दलित नेत्यांपैकी एक 
- 2011मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सोडून महायुतीमध्ये सहभागी झाले 
- लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिल्याबद्दल मंत्रिपदाचे बक्षीस 
-------------------------------------  
एस. एस. अहलुवालिया (दार्जिलिंगचे खासदार) 
जन्म - 4 जुलै 1951 
शिक्षण - बी. एससी; एलएलबी 
- सर्व पक्षांतील नेत्यांशी मैत्रीचे संबंध 
- अनेक महत्त्वाच्या विधेयकावर संशोधन करणारे भाजपचे "रिसर्च स्कॉलर‘ 
- स्वत-ची मते बिनधास्तपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध 
-------------------------------------  
एम. जे. अकबर (राज्यसभा खासदार) 
जन्म - 11 जानेवारी 1951 
शिक्षण - एम. ए. 
- संपादक, लेखक आणि देशातील वरिष्ठ पत्रकार 
- कधीकाळी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे निकटवर्तीय 
- भाजपमधील आधुनिक मुस्लिम चेहरा; मोदींचे खंबीर पाठीराखे 
-------------------------------------  
रमेश जिगजिणगी (विजापूरचे खासदार) 
जन्म - 28 जून 1952 
शिक्षण - बी. ए. 
- भाजपमधील दलित नेते 
- पाच वेळा लोकसभेवर निवड 
- कर्नाटकमधील पक्षाचे महत्त्वाचे नेते 
-------------------------------------  
पुरुषोत्तम रूपाला (राज्यसभा खासदार) 
जन्म - 1 ऑक्‍टोबर 1954 
शिक्षण - बी. एससी; बी. एड. 
- गुजरातमधील कडवा पटेल समाजातील वजनदार नेते 
- पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय 
- गुजरातचे कृषिमंत्री म्हणून काम 
-------------------------------------  
अनिल माधव दवे (राज्यसभा खासदार) 
जन्म - 6 जुलै 1956 
शिक्षण - एम. कॉम. 
- मध्य प्रदेशातील भाजपचे रणनीतीकार 
- पर्यावरणवादी आणि नद्यांसंदर्भात काम 
- पर्यावरणविषयक अनेक पुस्तकांचे लेखन 
-------------------------------------  
अर्जुन राम मेघवाल (बिकानेरचे खासदार) 
ज्न्म - 7 डिसेंबर 1954 
शिक्षण - एम.ए; एलएलबी; एमबीए 
- सरकारी वाहन न वापरता सायकलवर लोकसभेत येणारे खासदार 
- राजस्थान "केडर‘चे माजी "आएएस‘ अधिकारी 
- हिंदीसह स्थानिक भाषांच्या वापराबद्दल आग्रही 
-------------------------------------  
विजय गोयल (राज्यसभा खासदार) 
जन्म - 4 जानेवारी 1954 
शिक्षण - डी.लिट; एम. कॉम; एलएलबी 
- दिल्लीतील विधानसभा निवडणुकीवेळी पंख छाटण्यात आले होते 
- कौशल्यपूर्ण आणि माध्यमांशी चांगले संबंध असलेले दिल्लीतील नेते 
- केजरीवाल यांना रोखण्यासाठी गोयल यांना बळ देण्यात आल्याची शक्‍यता 
-------------------------------------  
राजन गोहेन (नवगावचे खासदार) 
जन्म - 26 नोव्हेंबर 1950 
शिक्षण - बी.ए; एलएलबी 
- चहाच्या मळ्यांसदर्भात विविध प्रश्नांवर आंदोलने 
- आसामातील अहोम या महत्त्वाच्या समाजातील नेते 
- आसामात भाजपच्या विस्तारासाठी मदत 
-------------------------------------  
महेंद्रनाथ पांड्ये (चंदौलीचे खासदार) 
जन्म - 15 ऑक्‍टोबर 1957 
शिक्षण - एम.ए; पीएचडी 
- उत्तर प्रदेशातील भाजपचा ब्राह्मण चेहरा 
- आगामी विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न 
- पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे निकटवर्तीय 
------------------------------------- 
छोटू राम चौधरी (नागौरचे खासदार) 
जन्म - 1 मार्च 1948 
शिक्षण - एम.ए; बर्मिंगहॅम विद्यापीठातून पदवी 
- राजस्थानातील जाट समाजाचे वरिष्ठ नेते 
- माजी प्रशासकीय अधिकारी 
- ग्रामीण विकास या विषयात विशेष रुची 
-------------------------------------
पी. पी. चौधरी (पालीचे खासदार) 
जन्म - 12 जुलै 1953 
शिक्षण - बी. एससी; एलएलबी 
- वरिष्ठ वकील, लोकसभेतील उपस्थितीबाबत कौतुक 
- राजस्थानातील इतर मागासवर्गीय समाजाचे नेते 
- वयाच्या आठव्या वर्षापासून संघाचे कार्यकर्ते 
------------------------------------- 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com